बारामतीत कुणाला लागणार झटका, पाहा ओपिनियन पोलनुसार कोण होणार खासदार?
बारामतीत कांटे की टक्कर पाहायला मिळू शकते. कारण दोन्ही उमेदवार हे पवार घराण्यातील आहेत. या ठिकाणी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या विरुद्ध शरद पवार यांची मुलगी सुप्रिया सुळे लढत आहेत. टीव्ही ९ च्या ओपिनियन पोलनुसार पाहा बारामतीत कोणाचा विजय होऊ शकतो.
Baramati Opinion Poll : पहिल्या टप्प्यातील मतदानापूर्वी TV9, Peoples Insight, Polstrat चे सर्वेक्षण आले आहे. यावेळी महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे सांगण्यापूर्वी, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, या सर्वेक्षणात सुमारे 25 लाख लोकांची मते जाणून घेतली आहेत. आता महाराष्ट्राबाबत बोलायचे झाले तर राज्यातील लोकसभेच्या ४८ जागांपैकी एनडीएला २८ जागा मिळत असल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. यामध्ये 25 जागा भाजपच्या वाट्याला तर तीन जागा शिवसेनेला (शिंदे गट) जातील.
महाविकास आघाडीला 20 जागा मिळत आहेत. शिवसेना (उद्धव गट) 10 जागा मिळताना दिसत आहेत. उमेदवारांबाबत बोलायचे झाले तर नागपूरमधून नितीन गडकरी, बारामतीतून सुप्रिया सुळे आणि उत्तर मुंबईतून पियुष गोयल विजयी होताना दिसत आहेत.
अजित पवारांच्या पत्नीला धक्का बसू शकतो
बारामतमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना पराभवाचा धक्का बसू शकतो. कारण या जागेवर सुप्रिया सुळे पुन्हा एकदा विजय मिळवू शकतात. या ठिकाणी पवार विरुद्ध पवार असा सामना होत आहे. त्यामुळे अजित पवार गटाला धक्का बसू शकतो.
औरंगाबादची जागा भाजप जिंकू शकते. लातूर लोकसभेची जागा काँग्रेस काबीज करू शकते. मावळमधून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा विजय होऊ शकतो.
भाजप- 25 काँग्रेस- 05 शिवसेना (शिंदे गट) – 03 राष्ट्रवादी (अजित गट) – 00 शिवसेना (उद्धव गट) – 10 राष्ट्रवादी (शरद गट) – 05 इतर- 00
मतांच्या टक्केवारीच्या दृष्टीने महाराष्ट्राचा ओपिनियन पोलनुसार एनडीएला- 40.22 टक्के मते, महाविकासाआघाडीला – 40.97 टक्के मते तर इतरांना 3.22 मते मिळू शकतात. 15.59 टक्के लोकांनी अजून निर्णय घेतलेला नाही.