Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘विष्णू चाटेने वाल्मीक कराडचा मेसेज सुदर्शन घुलेला दाखवला अन् गेम झाला…’, संतोष देशमुख खटल्यात कोर्टात काय काय झाला युक्तीवाद

Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले.

'विष्णू चाटेने वाल्मीक कराडचा मेसेज सुदर्शन घुलेला दाखवला अन् गेम झाला...', संतोष देशमुख खटल्यात कोर्टात काय काय झाला युक्तीवाद
beed court santosh deshmukh caseImage Credit source: TV 9 Marathi
Follow us
| Updated on: Mar 26, 2025 | 2:50 PM

Santosh Deshmukh Murder Case Court Hearing: बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या सुनावणीस कोर्टात सुरुवात झाली. यावेळी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि आरोपीच्या वकिलांनी युक्तीवाद केला. या प्रकरणात पुढील सुनावणी आता १० एप्रिल रोजी होणार आहे. या प्रकणात बुधवारी कोर्टात काय काय घडले?

बुधवारी सुनावणीसाठी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची उपस्थिती होती. वाल्मीक कराड याचे वकील विकास खाडे व त्यांच्या वकिलांची टीमही कोर्टात उपस्थित होती. आरोपींची व्हीसीद्वारे हजेरी लावण्यात आली. आधी आरोपींची ओळख परेड झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची केस ओपन करण्याची मागणी केली. त्यासाठी त्यांनी मुंबईमधील 26/ 11 बॉम्ब हल्ल्याचा खटल्याचा संदर्भ दिला. खंडणी प्रकरण, मारहाण प्रकरण आणि हत्या प्रकरणाचा पूर्ण घटनाक्रम वेळ तारीखनुसार 32 मिनिट्यांच्या युक्तीवादातून त्यांनी सांगितला.

निकम यांच्या युक्तिवादामधील महत्त्वाचे मुद्दे

  • आवादा ही एक ऊर्जा कंपनी आहे. या कंपनीने मासाजोग शिवारात 32 एकर जमिनीवर गोडाऊन केले. त्या ठिकाणी सुनील शिंदे हे प्रोजेक्ट मॅनेजर आहेत तर शिवाजी थोपटे हे कंपनीचे भूसंपादन अधिकारी आहेत. 8 ऑक्टोबरपासून खंडणी प्रकरणाला सुरुवात झाली. आठ ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता परळी येथील जगमित्र कार्यालयात विष्णू चाटे, वाल्मीक कराड यांच्यासोबत कंपनीच्या अधिकारी शिवाजी थोपटे यांची बैठक झाली. वाल्मीक कराड याने दोन कोटीची खंडणी मागणी केली. अन्यथा काम थांबवा. असे सांगितले. (या ठिकाणचे टॉवर लोकेशन आणि सीडीआर पुरावे सादर केले)
  • 9 ऑक्टोबर 2024 थोपटे यांनी आवाजा कंपनीचे उपाध्यक्ष अल्ताफ तांबोळी यांना फोनवरून दोन कोटीची खंडणी मागितल्याचे माहिती दिली. पोलिसात तक्रार द्यावी का? अशी विचारणा केली. त्यावेळी अल्ताफ तांबोळी यांनी तक्रार देऊ नका, असे सांगितले. त्यामुळे या घटनेचा गुन्हा त्यावेळी नोंद झाला नाही.
  • 26 नोव्हेंबर 2024 सुदर्शन घुले हा गँगचा प्रमुख आहे. तो कराडचा निकटवर्ती आहे. साडेअकरा वाजता तो साइटवर गेला. शिवाजी थोपटे याला धमकी दिली. कराडची मागणी पूर्ण न केल्यास काम बंद करा, असे सांगितले. वाल्मीक कराडने सुदर्शन घुले मार्फत हा मेसेज दिला.
  • 29 नोव्हेंबर 2024 सकाळी साडेअकरा वाजता वाल्मीक कराड यांनी विष्णू चाटेचा मोबाईलवरून सुनील शिंदे यांना फोन केला. घुले याने सांगितले त्या पद्धतीने काम करा. अन्यथा कंपनी बंद करा, असे सांगितले. यावेळी सुनील शिंदे यांनी आपला फोन स्पीकरवर ठेवला होता. तो शिवाजी थोपटे हे ऐकत होते. थोपटे याने वाल्मीक कराडचा आवाज ओळखला.( वाल्मीक करड याच्या आवाजाच्या नमुनाचे पुरावे) शिवाय हा कॉल सुनील शिंदे यांनी रेकॉर्डही केला होता.
  • 29 तारखेला दुपारी एक वाजता सुदर्शन घुले हा पुन्हा येथील कार्यालयात गेला व कराड यांना भेटा व त्यांची मागणी पूर्ण करा असा मेसेज सुनील शिंदे आणि शिवाजी थोपटे यांना दिला. त्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग सुनील शिंदे यांच्याकडे आहे.
  • 29 तारखेला दुपारी सव्वा दोन वाजता वाल्मीक कराड व इतर सर्व आरोपी विष्णू साठे याच्या केज येथील पक्षाच्या कार्यालयात भेटले. त्याचे सीसीटीव्ही फुटेज, टॉवर लोकेशन, पुरावे आहेत.
  • 6 डिसेंबर रोजी सुदर्शन घुले प्रतीक घुले सुधीर सांगळे, हे साडेबारा वाजता आवाजा कंपनीच्या मसाजोग येथील ऑफिसमध्ये आले. सुरक्षा रक्षकाला शिवीगाळ केली मारहाण केली. त्यावेळी शिवाजी थोपटे बाहेर आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी सांगितले दोन कोटीची मागणी पूर्ण करा किंवा काम बंद करा. यासंदर्भात माहिती सरपंच संतोष देशमुख यांना कोणीतरी दिली. हा वाद मिटवण्यासाठी सरपंच संतोष देशमुख व गावातील काही लोक आले. यावेळी सुदर्शन घुले यांनी संतोष देशमुख यांना धमकी दिली. त्यानंतर याची पोलिसांना माहिती दिली. दुपारी दीड वाजता पोलीस घटनास्थळी दाखल झाले व घुले व इतर आरोपींना ताब्यात घेऊन गेले. पण या सर्व आरोपींना प्रत्यक्ष अटक 7 डिसेंबर रोजी पहाटे दाखवण्यात आली. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली नाही, असे निकम यांनी न्यायालयाला सांगितले.
  • 7 डिसेंबर 2024 रात्री आठ वाजता वाल्मीक कराड याला घुले यांनी फोन केला. फोनवर घडलेली संपूर्ण हकीकत सांगितली. यावेळी कराड यांनी अडथळा आणतील त्यांना संपवा असे सांगितले, अशी कबुली घुले यांनी दिली आहे. (त्याचे पुरावे सादर केले आहेत)

हाच तो मेसेज, अन् पुढे झाली हत्या

  • 8 डिसेंबर रोजी विष्णू चाटे सुदर्शन घुले व अन्य एक गोपनीय साक्षीदार असे सर्वजण केज मांजरसुंबा रोडवर नांदूर फाटा येथे तिरंगा हॉटेल वर रात्री नऊ वाजेच्या सुमारास एकत्रित भेटले. त्यांची बैठक झाली. यावेळी विष्णू चाटे संतापला होता. यावेळी घुले यांनी चाटेला सांगितले मी त्या ठिकाणी गेलो होतो. पण संतोष देशमुख आडवे आले. यावेळी विष्णू चाटे याने वाल्मीक कराड याचा मेसेज सुदर्शन घुले याला दिला. आडवे आले तर कायमचा धडा शिकवा. (या संपूर्ण प्रकरणाचे टॉवर लोकेशन व इतर पुरावे सादर केले आहेत)
  • त्यानंतर 9 डिसेंबर 2024 दुपारी साडेतीन वाजता संतोष देशमुख केस बीड रोडवर उमरी फाटा टोल नाका येथून अपहरण करून क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली. किती क्रूर पद्धतीने मारले याचे फोटो आणि व्हिडिओ यातून दिसत आहे. आरोपी यावेळी हसून आनंद घेत होते. आमचे काही होऊ शकत नाही. आमच्यावर यापूर्वीही केसेस आहेत अशा धारणा होत्या. चार्ज फ्रेमसाठी ही केस तयार आहे. असा तब्बल 32 मिनिट युक्तिवाद उज्वल निकम यांनी केला.

वाल्मीक कराडचे वकील काय म्हणाले…

वाल्मीक कराड याचे वकील विकास खाडे यांनीही कोर्टात युक्तिवाद सुरुवात केली. ते म्हणाले, उज्ज्वल निकम यांनी सांगितलेली सर्व घटना याचे सीडीआर आणि लोकेशन पुरावे वारंवार सांगितले जात आहेत. परंतु यातील काहीच आम्हाला मिळालेले नाही. हे मिळावे यासाठी आम्ही मागील तारखेला अर्ज केलेला आहे. आजही अर्ज केला आहे. हे सर्व पुरावे, कागदपत्र मिळाल्याशिवाय हे पुढे जाता येणार नाही. चार्ज प्रेम करता येणार नाही. यावर माननीय न्यायाधीशांनी सर्व कागदपत्र आरोपीच्या वकिलांना उपलब्ध करून देण्यात यावेत, असे आदेश दिले.

हे सुद्धा वाचा

उज्ज्वल निकम यांनी कागदपत्रे आम्ही देतो केस पुढे घेऊन जाऊ शकतो असे म्हणणे मांडले. यावर आरोपीचे वकील विकास खाडे यांनी आपण म्हणता म्हणून केस ओपन होईल, असे होत नाही, असे निकम यांनी सुनावले. यावेळी त्यांनी वकील यांनी गोपाल कृष्ण केसचा संदर्भ दिला. एक तासात संपूर्ण मागणी केलेले कागदपत्रे दिले जातील, असे उज्वल निकम यांनी सांगितला. यावर कागदपत्र मिळाल्यानंतर आम्हाला अभ्यास करण्यासाठी वेळ द्यावा, अशी मागणी केली. त्यानंतर माननीय न्यायालयाने आरोपींच्या वकिलांची मागणी मान्य करत पुढील सुनावणीची तारीख 10 एप्रिल दिली.

हे ही वाचा…

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण? उज्ज्वल निकम यांचा कोर्टात महत्वाचा युक्तीवाद

महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात...
महाराष्ट्रासह मुंबईकरांसाठी मोठी बातमी, पुढील 4 ते 5 दिवस राज्यात....
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य
'कुत्रे अन् मांजरांवरून..', वाघ्या कुत्र्याच्या वादावर जरांगेंचं भाष्य.
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले
प्रत्येक गोष्टीत वाद..., वाघ्या समाधीच्या वादावरून मुख्यमंत्री संतापले.
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य
'... तर मुंडेंची आमदारकी रद्द होणार', अजंली दमानियांचं मोठं वक्तव्य.
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया
'मुलं मुंडेंची बायको नाही, अस कसं..', करूणा शर्मांची पहिली प्रतिक्रिया.
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर...
करूणा शर्मांच्या याचिकेवर मुंडेंचे वकील म्हणाले, लग्न झालच नाही तर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर....
सालियन प्रकरणातील मोठी बातमी, दिशा खाली पडली तेव्हा तिच्या शरिरावर.....
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत
त्यांनी घरात कबर बनवा, औरंगजेबाच्या कबरीवरून धीरेंद्र शास्त्रींचं मत.
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं
लाडक्या बहिणींना 2100 कधी मिळणार? महायुतीच्या नेत्यानं वर्षच सांगितलं.
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल
'सगळं लपवण्याचा प्रयत्न...', आरोपींच्या कबुलीनंतर दमानियांकडून सवाल.