Beed Building Collapse VIDEO | पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली 4 मजली बिल्डिंग… बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना!

Beed Building Collapse | बीडमधील चार मजली इमारत केवळ दहा मिनिटात पत्त्यांसारखी कोसळली. इमारतीतून बाहेर काढण्यात आलेल्या नागरिकांसाठी हे दृश्य पाहणं खूप क्लेशदायी ठरलं.

Beed Building Collapse VIDEO | पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळली 4 मजली बिल्डिंग... बीडमध्ये काळजाचा ठोका चुकवणारी घटना!
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jun 08, 2022 | 1:30 PM

बीडः बीड (Beed city) शहरात आज एक मोठी दुर्घटना घडली. शहरात एका ठिकाणी दोन इमारतींच्या मधल्या जागेवर बांधकाम सुरु होतं. यावेळी हादरे बसल्याने एक इमारत अक्षरशः एका बाजूने कलली होती. एका सजग नागरिकाने सदर माहिती तत्काळ प्रशासनाला दिली. प्रशासकीय  (Beed Administration)अधिकाऱ्यांनीही तत्काळू सूत्रे हालवत इमारतीतील नागरिकांना बाहेर काढलं. त्यापुढच्या दहा मिनिटांची दृश्य हृदयाचा ठोका चुकवणारी होती. काही क्षणातच ही चार मजली बिल्डिंग पाहता पाहता कोसळली (Building Collapse). इमारतीत राहणाऱ्या नागरिकांच्या डोळ्यादेखत ही घटना घडली. काही मिनिटांपूर्वी आपण तिथं होतो आणि आता होत्याचं नव्हतं झालं, ही दृश्य पाहून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली गेली. पण सुदैवानं सर्वांचे प्राण वाचले, यासाठीही आभार मानले गेले.

कुठे घडली घटना?

बीड पोलीस अधीक्षक कार्यालयासमोरील दोन ईमारतींच्या मधोमध रिकाम्या जागेवर बांधकाम सुरू होते. याच दरम्यान हादरा बसून एक चार मजली ईमारत कलली होती. आता ही इमारत कोणत्याही क्षणी कोसळू शकते, असं पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांना जाणवलं. त्यांनी ही माहिती तत्काळ बीड प्रशासनाला कळवली.

Beed Building

प्रशासनाने तातडीने हालचाली करत ईमारतीमधील सर्वच नागरिकांना बाहेर काढले. मात्र दहाच मिनिटात सदर ईमारत पत्यासारखी कोसळली. ईमारत कोसळताना चे दृष्ये मोबाईल कॅमेरात कैद झाले आहेत. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.Beed Building

डोळ्यादेखत घर गेलं…

आपल्या डोळ्यादेखत घर कोसळल्याचं पाहणं कोणत्याही नागरिकांसाठी अत्यंत क्लेशदायी असतं. पण या घटनेत या दुर्घटनेपेक्षा जास्त महत्त्वाची ठरली ती सर्वांचे प्राण वाचल्याची घटना. पत्रकार ज्ञानेश्वर वायबसे यांचे सर्व नागरिकांनी आणि प्रशासनाने आभार मानले. त्यांच्या सजगतेमुळे इमारतीतील सर्वच नागरिकांचे प्राण वाचले.

दोषी कोण?

सदर इमारत अशा प्रकारे कोसळण्यासाठी कोण जबाबदार आहे, याचा तपास सध्या सुरु आहे. दोन इमारतींच्या मध्यभागी बांधकाम सुरु होतं. यावेळी बांधकामाच्या प्रक्रियेत चूक झाल्यामुळे आमची बिल्डिंग पडली, असा दावा येथील नागरिक करत आहेत. प्रशासकीय स्तरावर यासंबंधीची चौकशी होऊन प्रत्यक्ष दोषी कोण आहे, हे उघडकीस येईल.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.