संतोष देशमुख प्रकरणी ‘त्या’ मिस्ट्री वुमनची हत्या, पाच वेगवेगळ्या नावांनी… अंजली दमानिया यांचा सर्वात मोठा आरोप काय?
बीडच्या सरपंच संतोष देशमुख यांना अडकवण्यासाठी तयार झालेल्या एका महिलेची हत्या झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केला आहे. ही महिला वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी तयार केलेल्या महिलेची हत्या करण्यात आलेला धक्कादायक प्रकार आला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा गंभीर आरोप केला आहे. अंजली दमानिया यांनी बीड पोलीस अधीक्षकांकडे या प्रकरणाची माहिती मागितली आहे. ही महिला ५ वेगवेगळ्या नावांनी वावरत होती, असा दावाही अंजली दमानिया यांनी केला आहे. मनीषा बिडवे, मनीषा गोंदवले या नावांनी महिलेचा वावर होता, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे.
अंजली दमानिया यांनी नुकतंच टीव्ही ९ मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी संतोष देशमुख यांच्यावर अनैतिक संबंधांचा आरोप करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या महिलेची हत्या करण्यात आली आहे. आता याप्रकरणी अंजली दमानिया यांनी विविध आरोप केले आहेत.
अनेक लोकांवर खोटे आरोप करायचे
“दोन दिवसांपूर्वी तिकडच्या एका पत्रकाराकडून मला अशी माहिती मिळाली की कळंबला राहणाऱ्या मनीषा बिडवे नावाच्या एक बाई आहेत. या असेच सर्व प्रयोग करायच्या आणि अनेक लोकांवर खोटे आरोप करायचे हाच त्यांचा मूळ व्यवसाय होता. संतोष देशमुखांना अडकवण्यासाठी वाल्मिक कराड हे सर्व करणार होते. त्या बाईंना तयारही ठेवण्यात आले होते. संतोष देशमुखांना मारहाण झाल्यानंतर त्यांचा प्राण गेला आणि मग रस्त्यात फेकून ती मंडळी गायब झाली होती. खरंतर संतोष देशमुखांना त्या बाईकडे नेऊन त्यांना एका गुन्ह्यात अडकवण्याचा त्यांचा प्लॅन होता, असं सांगितलंय जातंय”, असे अंजली दमानिया यांनी म्हटले.
त्या बाईची पाच नावे
“त्यात या बाई अनेक लोकांवर आरोप करायच्या आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची नावे आहेत. मनीषा अकूजकर हे नाव त्या आडसला असताना वापरायच्या. कळंबला असताना त्या मनीषा बिडवे आणि मनीषा मनोज बियाणे अशा दोन नावांनी काम करायच्या. आंबेजोगाईला असताना त्या मनीषा उकाडे आणि मनीषा संजय गोंदवले या नावाने त्या काम करायच्या”, असे अंजली दमानिया म्हणाल्या.
अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे
“मला जी माहिती मिळाली ती मी बीडचे पोलीस अधिकारी नवनीत कॉवत यांना दिली. कळंब हे धारशिवमध्ये येते. धाराशिवचे जे जाधव म्हणून जे एसपी आहेत, त्यांच्याशी मी बोलले, त्यांनी आज ही बातमी कन्फर्म केली आहे. मनीषा बिडवे नावाच्या महिलेची हत्या डोक्यात हातोडा घालून झालेली आहे. त्याच्या घराच्यांनीही त्यांच्या या कामांमुळे माहिती देण्यास नकार दिला आहे. ही अतिशय धक्कादायक बाब आहे. मला असं वाटतं की अशा ज्या बायका जिथे जिथे आहेत त्यांच्यावर अतिशय कडक शिक्षा झाली पाहिजे. ज्या ज्या बायकांनी अनेक आरोप केलेले असतील त्या सर्व गोष्टींची चौकशी झाली पाहिजे. हे सर्व प्रकरण आता थांबलं पाहिजे”, असेही अंजली दमानिया यांनी म्हटलं.