AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वाल्मिकी कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे; धनंजय मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट

धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत आहे. तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

वाल्मिकी कराड हे सुरेश धस यांच्याही जवळचे; धनंजय मुंडे यांचा मोठा गौप्यस्फोट
Santosh Deshmukh Murder case
Follow us
| Updated on: Dec 26, 2024 | 5:42 PM

बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगमधील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणाचे पडसाद हिवाळी अधिवेशनात उमटले. या प्रकरणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची बाजू मांडली. यावेळी देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची उचलबांगडी करण्याचे आणि नवीन पोलीस अधीक्षक नियुक्तीचे आदेश दिले होते. त्यानुसार, 24 तासात या पदावर नवनीत कॉवत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर दुसरीकडे याप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांचे नाव वारंवार समोर येत आहे. ते याप्रकरणात मुख्य आरोपी आहेत, असा आरोप संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांकडून केला जात आहे. वाल्मिक करडावरून विरोधक सातत्याने सरकारला धारेवर धरत आहेत. तर दुसरीकडे आता धनंजय मुंडे यांनी आता एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

धनंजय मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी धनंजय मुंडे यांनी आमदार सुरेश धस यांच्याबद्दल एक मोठा गौप्यस्फोट केला. वाल्मिक कराड हे जसे माझ्या जवळचे आहेत, तसेच त्यांची सुरेश धस यांच्यासोबत जवळीक होती, असे धनंजय मुंडेंनी म्हटले. यामुळे आता मोठी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्र्यांची भेट योगायोगाने झाली. बीडमध्ये संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या झाली, ही हत्या ज्याने कोणी केली, त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. त्याला फाशी व्हायला पाहिजे. या मताचा मी आहे. संतोष देशमुख हा माझ्या जिल्ह्यातील एक सरपंच आहे. मलाही त्याच्या बाबतीत तितकाच आदर आहे. जे कोणी यात गुन्हेगार आहे, त्या सर्वांना फाशीची शिक्षा करा, मग ते कोणीही असो. कुणाच्याही कितीही जवळचं असो, मग तो माझ्याही जवळच असो. त्यालाही सोडायचा नाही. पण फक्त राजकारणासाठी माझ्यावर आरोप करणं, याच्यामागे काय राजकारण असू शकतं, हे आपण समजू शकता, असे धनंजय मुंडे म्हणाले.

ही चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे

वाल्मिक कराड यांची जवळीक सुरेश धस यांच्यासोबत होती. ते माझ्याही जवळचे आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याची चौकशी सुरु आहे. ही चौकशी पारदर्शकपणे व्हायला पाहिजे मी देखील या मताचा आहे. पण माझ्याविरोधात सकाळी सकाळी बोलल्याशिवाय जर तुमचा दिवस उजडत नसेल, तर त्यासाठी आपण काहीही करु शकत नाही. मिडिया ट्रायलमध्ये माझं नाव खराब करण्यासाठी मंत्रि‍पदाची शपथ घ्यायच्या आधीपासून, मंत्री म्हणून शपथ घेतल्यानंतर, विभाग कोणता मिळावा, कोणता मिळू नये यासाठी आणि त्यानंतर बीडचं पालकमंत्रीपद कोणी घ्यावं, कुणी घेऊ नये हा सर्व विषय मी माझ्या पक्षाचे नेतृत्व अजित पवारांकडे दिला आहे. या प्रकरणाची चौकशी गतीने सुरु आहे, असेही धनंजय मुंडेंनी म्हटले.

मला समाजकारणातून आणि राजकारणातून उठवणे हा उद्देश

लवकरात लवकर ही चौकशी व्हावी. इतकंच नव्हे तर हे प्रकरण फार भयंकर आहे. त्यामुळे याचा खटला फास्ट ट्रक कोर्टात चालावा. चार्जशीट लवकर दाखल व्हायला हवी. याप्रकरणी ज्या गोष्टी निष्पन्न होतात, त्या कोर्टात लगेचच समोर आल्या पाहिजेत. मला समाजकारणातून आणि राजकारणातून उठवणे हा यामागचा उद्देश असू शकतो. यामागची वस्तुस्थिती जी काही असेल ती मी आधीच सांगितली आहे. त्यामुळे यामागे जो कोणी असेल त्याला सोडायचं नाही. याप्रकरणी जो कोणी आरोपी आहे, त्यालाही फाशी दिली पाहिजे, मी या मताचा आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम
भारतीय लष्कराने कसा केला हल्ला, पाहा संपूर्ण घटनाक्रम.
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?
तुझ्या सिंदूरचा बदला... इम्तियाज जलील ऑपरेश सिंदूरवर बघा काय म्हणाले?.
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात
जखमी दहशतवाद्यांची भेट घेण्यासाठी पाकिस्तानी अधिकारी रुग्णालयात.
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले
त्यांना आणखी काय बर्बाद करणार?, राज ठाकरेंनी खडेबोल सुनावले.
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी
पिक्चर अभी बाकी है, ऑपरेशन सिंदूरनंतर त्या ट्वीटनं पाकला पुन्हा धडकी.
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर
मसुद अझरचं कुटुंब जिथे नेस्तनाभूत झालं, त्या कोटलीमधील फोटो आले समोर.
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर
ऑपरेशन सिंदूरचे 3 मोठे शिकार, 5 टॉप कमांडरचा खात्मा, नावासह फोटो समोर.
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव
दहशतवाद्याना प्रत्युत्तर देण्यास भारताने आपला अधिकार..- परराष्ट्र सचिव.
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी
निष्पाप नागरिकांना इजा होणार नाही अशी काळजी घेतली- कर्नल सोफिया कुरेशी.
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री
तपासात दहशतवाद्यांचे पाकिस्तानशी संबंध उघड झाले -परराष्ट्र सचिव मिस्री.