मनोज जरांगेंची भेट घेऊन परतणाऱ्या नवनिर्वाचित खासदाराच्या ताफ्यातील गाडीचा अपघात
beed mp bajrang sonawane: निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे सहज भेटायला आले होते. सरकार मराठ्यांना भीत नव्हते. या निवडणुकीत मराठा समाजाने एकवटून दाखवून दिले. आता तरी सरकारने जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा.

बीड लोकसभा मतदार संघातील नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनेवणे यांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात झाला. सोलापूर – धुळे महामार्ग बजरंग सोनवणे यांच्या ताफ्यात असलेल्या गाडीचा अपघात झाला. या अपघातात दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. बीड लोकसभेतून निवडून आलेले बजरंग सोनवणे हे काराने मंगळवारी रात्री मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी गेली होती. त्यानंतर अंतरवाली सराटीहून बीडकडे परत जात असताना हा अपघात झाला.
कुठे झाला अपघात
सोलापूर – धुळे महामार्ग शहागड येथे काही मुस्लिम बांधव बजरंग सोनवणे यांचा सत्कार करण्यासाठी थांबले होते. हा सत्कार स्वीकारण्यासाठी बजरंग सोनवणे यांची गाडी शहागड पुलावर थांबली. त्यावेळी त्यांच्या पाठीमागे त्यांच्या ताफ्यात फॉर्च्यूनर आणि स्विफ्ट गाडी होती. बजरंग सोनवणे यांच्या गाडीने ब्रेक लावल्यानंतर त्यांच्या पाठीमागे येणारे फॉर्च्यूनरने ही ब्रेक मारला. या फॉर्च्युनर मागे चालत असलेल्या स्विफ्ट कारनेही ब्रेक मारला. परंतु ब्रेक मारताना स्विफ्ट कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि या कारने बजरंग सोनवणे यांच्या गाडीच्या पाठीमागे चालणाऱ्या फॉर्च्युनर गाडीला धडक दिली. अपघातात स्विफ्ट कारमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत. मात्र बजरंग सोनवणे यांच्या गाडीला आणि बजरंग सोनवणे यांना कुठलीही दुखापत झाली नाही.
मनोज जरांगे यांची बजरंग सोनवणे यांनी का घेतली भेट
निवडून आल्यानंतर बजरंग सोनवणे सरळ मनोज जरांगे यांच्या भेटीसाठी गेले. त्याच्या यशात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मोठा वाटा आहे. यामुळे बरजंग सोनवणे पंकजा मुंडे यांचा पराभव करु शकलो. त्या भेटीवर बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, मी राजकारणी नाही, निवडणूक जिंकल्यानंतर बीडचे खासदार बजरंग सोनावणे हे सहज भेटायला आले होते. सरकार मराठ्यांना भीत नव्हते. या निवडणुकीत मराठा समाजाने एकवटून दाखवून दिले. आता तरी सरकारने जागे व्हावे आणि आरक्षण देण्याबाबत निर्णय घ्यावा.




लोकांनी स्वतः हून ही निवडणूक हातात घेतली
निवडणुकीत मी कोणालाही पाडा असे म्हटले नव्हते. लोकांनी स्वतः हून ही निवडणूक हातात घेतली होती. आता तरी देवेंद्र फडणवीस यांनी कोणालाही अंगावर घेऊ नये. नाहीतर लोकसभेला जसा इंगा दाखविला तसा विधानसभेला दाखवेल. आरक्षण दिले नाहीं तर राज्यातील 288 विधानसभा जागांवर निवडणूक लढवणार आहे. आता पंकजा मुंडे यांनी पराभवाची कारणे शोधली पाहिजे, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.