‘सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या’, अंजली दमानिया यांचा टोला

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सीआयडी चौकशीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. वाल्मिक कराडच्या अटकेतील विलंब आणि पोलिसांच्या भूमिकेवर त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी सीआयडी या टीव्ही मालिकेतील सीआयडी चीफ शिवाजी साटम यांच्याकडे तपास सोपवावा, असा टोला लगावला आहे. त्यांनी पोलिसांच्या भूमिकेवर तीव्र टीका केली आहे.

'सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे तपास द्या', अंजली दमानिया यांचा टोला
अंजली दमानिया यांचा टोला
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 7:00 PM

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या सीआयडी चौकशीवरुन उपरोधिक टोला लगावला आहे. त्यांनी आरोपी वाल्मिक कराड याच्या अटकेच्या घडामोडींवर भाष्य करताना संबंधित टोला लगावला. “9-31 तारखेपर्यंत जे चाललं आहे ती धुळफेक आहे. पोलीस यंत्रणा शोधत नाही, सीआयडीला जमत नसेल तर शिवाजी साटम यांच्याकडे चौकशी द्यावी”, असा उपरोधिक टोला अंजली दमानिया यांनी लगावला. “हसण्यासारखी गोष्ट आहे”, असंही अंजली दमानिया म्हणाल्या. ज्येष्ठ अभिनेते शिवाजी साटम यांची सीआयडी मालिका ही प्रचंड लोकप्रिय आहे. या मालिकेत शिवाजी साटम हे सीआयडीचे प्रमुख आहेत. बीड प्रकरणाचा तपासावर सीआयडीकडून सुरु असलेल्या तपासावर भाष्य करताना हा तपास शिवाजी साटम यांच्याचकडे द्या, असा उपरोधिक टोला अंजली दमानिया यांनी लगावला आहे.

“जो व्यक्ती होता ज्याला अटक होणं गरजेचं होतं ते म्हणजे वाल्मिक कराड होते. धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्यायला बरेच जण मुख्यमंत्र्यांकडे गेले. त्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे. वाल्मिक कराडची अटक झाल्यानंतर मी परत आले. महाजेनकोची माहिती घेतली, जो अफाट पैसा घेतला जातोय त्याचा अभ्यास केला”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

‘माध्यमांना कळतं, पण पोलिसांना कळत नाही’

“माध्यमांना कळतं. मात्र पोलिसांना कळत नाही की तो शरण येणार आहे. महाजनकोचा प्लांड मी अभ्यासला, फ्या ऐश काय, बॉटम अॅश काय याचा अभ्यास केला. 80% फ्लाय ऐश सीमेंट कंपनीकडे जातो, मात्र जे बॉटम अॅश आहे ती धमक्या देत, पिस्तुली दाखवून उचलल्या जात. आधीचे एसपी होते ज्यांची बदली करण्यात आली त्यांची फक्त बदली नाही तर त्यांना कामातून काढलं पाहिजे. महाजनकोमधून एसपींना अनेक पत्र गेली होती”, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

हे सुद्धा वाचा

“मी काल गेले तेव्हा 3 मोटर सायकल्स लागल्या होत्या. धनंजय मुंडे, वाल्मिक कराडच्या कंपन्यांचे लोक होती. आम्ही त्यांच्या मागे लागलो तेव्हा ते पळून गेले. अभिनंदनाचे वर्षाव व्हायला लागले मात्र अभिनंदनासारखं त्यात काय होतं? 20-25 दिवस पोलिसांना एवढा वेळ का लागला? शिवसेना नेते मिलिंद नार्वेकरांनी ट्विटही केलं, त्यावर मी स्माईली पाठवली. मिलींद नार्वेकरांनी विरोधात भूमिका घ्यायला पाहिजे होती. ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे आहेत का? असा प्रश्न पडतो”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

वाल्मिक कराडच्या अटकेवर दमानिया काय म्हणाल्या?

“वाल्मिक कराडसोबत 15 तारखेपर्यंत बॉडीगार्ड सोबत होते. हे बॉडीगार्ड आले कुठून, पेड किंवा, जिवीताला धोका असेल तर हे बॉडीगार्ड पेड होते की कमीटीने दिलेले? त्यांच्या जीवीताला धोका आहे म्हणून देण्यात आलेले बॉडीगार्ड होते?गुन्हेगारांना अटक व्हायला पाहिजे होती, 15 तारखेला बॉडीगार्डला माघारी बोलवण्यात येतं. मागच्या एसपींनी मागे घेण्याचे ऑर्डर दिले, फोनवरून या बॉडीगार्ड्सला बोलवण्यात आलं आणि फरार आहे म्हणून सांगण्यात आलं”, अशी भूमिका अंजली दमानिया यांनी मांडली.

‘एकाच जातीचे अधिकारी’

“मी बीडच्या कार्यलयांचा अभ्यास केला, त्यात झाडून वंजारी समाजाचे अधिकारी आहेत. गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री असताना त्यांना हळूहळू भर्ती करण्यात आलं आणि नंतर बीडकडे आणण्यात आलं आहे. बीडचे अधिकारी मर्जीतले आहेत, समाजाचे आहेत ते दुसऱ्यांना काय न्याय देणार? निवडणुकीच्या काळात आमच्या बोटांना शाई लावण्यात आली आणि हाकलून दिलं. मत देऊ दिलं नाही”, असं अंजली दमानिया म्हणाल्या.

दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.