Accident | शनिवार घातवार !! 24 तासात 09 बळी, बीडमध्ये 06 तर बुलडाण्यात तिघांचा मृत्यू

ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात सहा प्रवासी जागीच ठार झाले आहेत.

Accident | शनिवार घातवार !! 24 तासात 09 बळी, बीडमध्ये 06 तर बुलडाण्यात तिघांचा मृत्यू
बीडमधील भीषण अपघाताची दृश्य Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Apr 23, 2022 | 12:07 PM

आजचा शनिवार हा घातवारच ठरला असं म्हणावं लागेल. कारण राज्यात दोन ठिकाणी अत्यंत भीषण अपघातांमध्ये (Accident) तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला आहे. बुलडाण्यात (Buldana Accident) तिघांचा तर बीडमध्ये (Beed Accident) सहा जणांचा रस्ते अपघातातात बळी गेला आहे. बीड जिल्ह्यात अत्यंत भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीपचा हा अपघात एवढा भीषण होता की, सहा जण जागीच ठार झाले आहेत. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथे भरधाव वेगात असलेल्या ट्रक आणि जीपची समोरासमोर धडक होऊन ही घटना घडली. हा अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ घडला आहे. अपघातात मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रक आणि जीपचा चुराडा झाला. वाहनांमधील प्रवाशांना या अपघातामुळे गंभीर जखमा झाल्याने काहींचा जागीच प्राण गेला.

बीड कुठे झाला अपघात?

हा भीषण अपघात अंबाजोगाई तालुक्यातील सायगावच्या खडी केंद्राजवळ झाला. आर्वी (ता.लातूर) येथून अंबाजोगाई तालुक्यातील राडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी नातेवाईक जीपने येत होते. दरम्यान सायगावजवळील खडी केंद्राजवळ समोरून भरधाव वेगात आलेल्या ट्रकने जोराची धडक दिली. यात पाच महिला व एक बालक जागीच ठार झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून मृतदेह व जखमींना अंबाजोगाई येथील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे.

अंबाजोगाईत जखमींवर उपचार सुरू

अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी तातडीने मदतीसाठी धावले. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. त्यानंतर जखमींना तत्काळ अंबाजोगाई येथील रुग्णालयात हलवण्यात आलं. जखमींवर उपचार सुरु असून अजूनही काही प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

बुलडाण्यात तिघांवर काळाचा घाला

बुलडाण्यात साखरपुड्यासाठी जाणाऱ्या तिघांचा अपघातात मृत्यू झाला. कार आणि ट्रॅव्हल्स बसचा अपघात झाल्यानं तीघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे जण गंभीर जखमी झाले. मेहकर आणि डोणगाव रोडवर हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले सगळेच चाळीसगावातील असल्याची माहिती मिळाली आहे. दिग्रसाल येथे साखरपुड्यासाठी जाणाऱ्या बसला अपघात झाला.

इतर बातम्या-

Summer Season : मराठवाड्यात ज्वारीचे क्षेत्र घटले मात्र, विदर्भातील शेतकऱ्यांना बाजारपेठेचे गणित कळले..!

Navneet Rana : नवनीत राणा यांनी खासदार विकास निधीतला किती निधी खर्च केला? संपूर्ण आकडेवारी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.