CCTV Video : सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परळीत विद्यार्थी सुरक्षित नाही? बाहेरून जिल्ह्यात आलेल्या विद्यार्थ्याला लुटले
विद्यार्थ्याजवळ असलेले सातशे रुपये आणि मोबाईल चोरट्यांनी काढून घेतले. त्यानंतर चोरटे त्याला जवळील एटीएममध्ये जबरदस्तीने घेऊन गेले आणि अकाऊंटमध्ये असलेली सर्व रक्कमही काढून घेतली. दरम्यान हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
परळी : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या परळीत विद्यार्थी सुरक्षित नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. बुलढाणा जिल्ह्यातून परळीत इंटर्नशिप (Internship)ची एक्झाम देण्याकरीता आलेल्या विद्यार्थ्याला लुटण्याचा प्रकार समोर आला आहे. गणेश घानोकार असं विद्यार्थ्याचं नाव असून तो परळीत एका इंजिनीअरिंग महाविद्यालयात इंटर्नशिपची परीक्षा देण्याकरीता आला होता. याच दरम्यान रात्री अंधार असल्यानं त्याने पहाटे चार वाजेपर्यंत रेल्वे स्थानकावर वेळ घालवला. त्यानंतर राहत असलेल्या लॉजकडे जात असताना रस्त्यातच त्याला चोरट्यांकडून लुटण्यात आलंय. याप्रकरणी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक (Arrest) केली आहे.
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या परळीत विद्यार्थी सुरक्षित नाही?#Parali #StudentLoot #Mobile #Money #CCTV pic.twitter.com/KWbUmgxn8B
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 16, 2022
एटीएममधून जबरदस्तीने पैसे काढून घेतले
विद्यार्थ्याजवळ असलेले सातशे रुपये आणि मोबाईल चोरट्यांनी काढून घेतले. त्यानंतर चोरटे त्याला जवळील एटीएममध्ये जबरदस्तीने घेऊन गेले आणि अकाऊंटमध्ये असलेली सर्व रक्कमही काढून घेतली. दरम्यान हा सर्व प्रकार एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मात्र घडलेल्या घटनेनंतर सामाजिक न्यायमंत्र्यांच्या परळीत विद्यार्थी सुरक्षित नसल्याचं बोललं जात आहे. एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेत पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असली तरी ही घटना घडल्याने इतर विद्यार्थ्यांमध्ये दहशत निर्माण झाली आहे. विद्यार्थ्याच्या तक्रारीनंतर संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A student who came for an internship exam in Parli was robbed by thieves)