Ambadas Danve : शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; अंबादास दानवेंचं संजय गायकवाडांना प्रत्युत्तर

शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चुन चुन के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल, असा इशारा त्यांनी गायकवाड यांना दिला आहे.

Ambadas Danve : शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचाय; अंबादास दानवेंचं संजय गायकवाडांना प्रत्युत्तर
संजय गायकवाड/अंबादास दानवेImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Sep 04, 2022 | 4:14 PM

बीड : शिवसैनिकांना शोधून मारणारा अजून जन्माला यायचा आहे, असे प्रत्युत्तर शिवसेना नेते आणि विधान परिषदेतील विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी संजय गायकवाड यांना दिले आहे. शिवसैनिकांना शोधून मारणार, अशाप्रकारची भाषा संजय गायकवाड (Sanjay Gaikwad) यांनी केली होती. त्यावर विचारले असता दानवेंनी हे प्रत्युत्तर दिले आहे. ते बीडमध्ये बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात बोलाल, तर चुन चुन के आणि गिन गिन के मारेंगे अशी डायलॉगबाजी संजय गायकवाड यांनी केली होती. याला आता शिवसेना (Shivsena) नेत्यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी गायकवाड यांच्यावर टीका केली आहे. संजय गायकवाड यांच्यात हिंमत असेल तर भ्याडपणाने बोलण्यापेक्षा समोर यावे. मग कळेल कोण चुन चुन के मारेल आणि कोण गिन गिन के मारेल, असा इशारा त्यांनी गायकवाड यांना दिला आहे.

दसरा मेळाव्यावरून टीका

मागील काही दिवसांपासून शिवसेना आणि शिंदे गट हमरीतुमरीवर आला आहे. दोन्ही बाजूकडील नेते एकमेकांवर टीका करण्याची संधी सोडत नाहीत. दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कात होत असतो. यंदा मात्र शिंदे गट त्यावर दावा करीत आहे. यावरून शिवसेना शिंदे गटावर टीका करत असताना त्याला शिंदे गटातील नेतेही प्रत्युत्तर देत आहेत. तर गद्दार म्हणून आमच्यावर सतत शिवसेनेचे नेते टीका करत आहेत. एकनाथ शिंदेंवर टीका करत आहेत. याच मुद्द्यावरून संजय गायकवाड यांनी शिवसेनेला इशारा दिला होता. एकनाथ शिंदेंवर टीका केली तर चुन चुन के मारेंगे, असे त्यांनी म्हटले होते. त्याला आता अंबादास दानवेंनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे.

हे सुद्धा वाचा

काय म्हणाले होते संजय गायकवाड?

‘लोकांना सेनेच्या दसरा मेळाव्याची सवय’

दसरा मेळाव्याला तयारी करायची गरज नसते. लोक उत्स्फूर्तपणे या मेळाव्याला येत असतात. आम्ही कोणताही भपकेबाजपणा करत नाहीत. लोक उत्साही असून ते आपली चटणी-भाकरी घेऊन मुंबईला येतात. लोकांना आता याची सवय झाली आहे. आधी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार ऐकायचे. आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचे विचार ऐकत असतात. शिंदे गटाचा मेळावा झाला तरी तो तेथे होणार नाही, हे नक्की, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

अंबादास दानवेंचे प्रत्युत्तर

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....