Beed : मशिदीवरच्या भोंग्यातून अजान सुरु झाली अन् समोर त्याचवेळेस हनुमान चालिसा लागली, तणावाची शक्यता?
शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी आदेश काढला की भोंगे काढावे लागतील अन्यथा मशीदीसमोह हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) चालवू. त्यानंतर मनसेसैनिकही कामला लागले आणि ठिकठिकाणी हेच सुरू झालं. आता बीडमध्येही असाच प्रकार समोर आलाय.
बीड : जेव्हापासून राज ठाकरेंची (Raj Thackeray Speech) गुढी पाडव्याची सभा झाली आहे. तेव्हापासून राज्यात एकच विषय गाजतोय तो म्हणजे मशीदीवरील भोंगे(Mosque Loud Speaker) . राज्यात त्यावरून सध्या जोरदार पॉलिटीकल राडा सुरू आहे. शिवतीर्थावरून राज ठाकरेंनी आदेश काढला की भोंगे काढावे लागतील अन्यथा मशीदीसमोह हनुमान चालीसा (Hanuman Chalisa) चालवू. त्यानंतर मनसेसैनिकही कामला लागले आणि ठिकठिकाणी हेच सुरू झालं. आता बीडमध्येही असाच प्रकार समोर आलाय. ऐन अजान सुरू झालं त्याचवेळेस हनुमान चालीसा सुरू केल्यानं तणाव निर्मण होण्याची शक्यता आहे. मुंबईतील विविध मनसे कार्यालयासमोर हनुमान चालीसा लावण्यात आली होती. आता हे लोन बीडपर्यंत पोहचले आहे. बीडमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांनी वैष्णो देवी मंदिरासमोर अजान सुरू असताना हनुमान चालीसा भोंग्यावर लावण्यात आली.
तणाव निर्माण होण्याची शक्यता
बीडमध्ये अजान सुरू असतानाच मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी भोंगा लावून चालीसा लावली आहे, त्यामुळे बीडमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. जोपर्यंत सरकार निर्णय घेणार नाही तोपर्यंत हनुमान चालीसा सुरूच राहतील असा पवित्रा मनसेनी घेतला आहे. राज ठाकरेंच्या या भाषणानंतर राज्यात जोरदार पॉलिटिकल राडा सुरू आहे. राज ठाकरेंनी हिंदुत्वाची घेतलेली भूमिका आणि महाविकास आघाडीला केलेलं टार्गट गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राज ठाकरेंची ही भूमिका आणि मशीदी आणि भोंगे याबाबत केलेलं हे वक्तव्य जातीय तेढ निर्माण करणारे आहे, अशी टीका विरोधकांकडून होत आहे. तर राज ठाकरेंच्या या भाषणाचे भाजप नेते मात्र जोरदार कौतुक करत आहेत.
राज ठाकरेंचं टार्गेट फक्त महाविकास आघाडी
पुण्यात मनसेच्या वर्धापनदिनाला बोलतानाच राज ठाकरेंनी आज हा फक्त ट्रेलर आहे. पूर्ण पिक्चर गुढी पाडव्याला शिवतिर्थावर असे म्हणत इशारा दिला होता. त्यानंतर मनसेसैनिकांनी राज ठाकरेंच्या सभेसाठी एक खास ट्रेलरही बनवला होता. त्यामुळे या सभेची उत्सुकता आणखी वाढली होती. राज ठाकरे गुढी पाडव्याला का बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. राज ठाकरेंनी यावेळी भाजपबाबत एक शब्दही काढला नाही. मात्र महाविकास आघाडी आणि खासकरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं. त्यानंतर त्यांनी त्यांचा मोर्चा शरद पवारांकडे आणि राष्ट्रवादीकडे वळवला. राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला असे म्हणत राज ठाकरेंनी पुन्हा राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
ED Action On Sanjay Raut: फक्त राऊतच नाही तर ‘आप’ नेत्यावरही ईडीची वक्रदृष्टी, संपत्ती जप्त