Beed : पाणी पिताना एकुलता एक मुलगा विहिरीत पडला! वाचवण्यासाठी गेलेल्या बापासह मुलगाही बुडाला

Beed News : केज तालुक्यातील एकुरका गावामध्ये धस कुटुंबीय होते. यावेळी बापलेक एकत्र असताना रोहन नावाच्या 13 वर्षांच्या मुलाला तहान लागली म्हणून तो शेतातील विहिरीजवळ गेला. शेतातल्या विहिरीतलं पाणी पिण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला.

Beed : पाणी पिताना एकुलता एक मुलगा विहिरीत पडला! वाचवण्यासाठी गेलेल्या बापासह मुलगाही बुडाला
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यूImage Credit source: Google
Follow us
| Updated on: Aug 26, 2022 | 1:27 PM

बीड : बीडमध्ये (Beed Drown) चार वर्षांची चिमुरडी तलावात बुडून दगावल्याची घटना ताजी असतानाच आता आणखी एका घटनेत बापलेकाचा बुडून मृत्यू (Beed Death) झाला आहे. बीडमध्ये घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जातेय. दरम्यान, मुलाला वाचवताना बापाचाही मृत्यू झालाय. तहान लागली म्हणून विहिरीचं पाणी पिण्यासाठी 13 वर्षांचा मुलगा गेला होता. त्यावेळी त्याचा पाय घसरला आणि विहिरीत पडला. यावेळी मुलाला वाचवण्यासाठी बापानेही विहिरीत उडी घेतली. पण दोघेंबी विहिरीच्या पाण्यात बुडाले आणि त्यांनी प्राण गमावलाय. बीड जिल्ह्यातील केज (Kej, Beed) तालुक्यामध्ये ही घटना घडलीय. दरम्यान, या घटनेमुळे एकट्या बीड जिल्ह्यातील गेल्या 24 तासांत तब्बल तिघांचा बुडून मृत्यू झालाय. परळी-गंगाखेड इथं खेळायला गेलेल्या चार वर्षांच्या चिमुकली साक्षी पवारचाही बुडून मृत्यू झाला होती.

एकुलत्या एका मुलगा गमावला..

केज तालुक्यातील एकुरका गावामध्ये धस कुटुंबीय होते. यावेळी बापलेक एकत्र असताना रोहन नावाच्या 13 वर्षांच्या मुलाला तहान लागली म्हणून तो शेतातील विहिरीजवळ गेला. शेतातल्या विहिरीतलं पाणी पिण्यासाठी गेला असताना त्याचा पाय घसरला आणि तो विहिरीत पडला. रोहित हा नटराज यांचा एकुलता एक मुलगा होता. रोहन पडल्याचं पाहताच त्याचे वडली नटराज धस यांनीही लगेचच मुलाला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली.

हे सुद्धा वाचा

मुलाला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न 33 वर्षीय नटराज धस यांनी केला. पण तो अपयशी ठरला. विहिरीतल्या पाण्याची पातळी जास्त होती. मुलाला वाचवण्याचा प्रयत्नात वडिलांनीही जीव गमावला. ही हृदयद्रावर घटना केज तालुक्यातील लोकांच्या मनाला चटका लावून गेलीय. या घटने परिसरात हळहळ व्यक्त कहोते आहे.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.