Bajrang Sonawane : शरद पवार यांना सोडलं तर माझी बायको म्हणेल, तुला… ‘त्या’ चर्चांवर खासदार बजरंग सोनावणे यांची मार्मिक प्रतिक्रिया

Bajrang Sonawane Attack On Mitkari : बजरंग बाप्पा सोनावणे हे बीडमध्ये जायंट किलर ठरले. पण त्यानंतर ते पुन्हा अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्यावरुन आता कलगीतुरा रंगला आहे.

Bajrang Sonawane : शरद पवार यांना सोडलं तर माझी बायको म्हणेल, तुला... 'त्या' चर्चांवर खासदार बजरंग सोनावणे यांची मार्मिक प्रतिक्रिया
अमोल मिटकरी यांना खोचक टोला
Follow us
| Updated on: Jun 12, 2024 | 10:23 AM

बीड लोकसभा निवडणुकीत बजरंग बाप्पा सोनावणे हे जायंट किलर ठरले आहेत. त्यांनी भाजपच्या पंकजा मुंडे यांचा अटीतटीच्या लढतीत पराभव केला. मराठवाड्यात भाजपला या निवडणुकीत खाते ही उघडता आले नाही. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मराठवाड्यात भोपळा मिळाला आहे. निवडणुकीनंतर बजरंग सोनवणे पुन्हा अजित पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा अमोल मिटकरी यांनी केला होता. त्याचा बाप्पा सोनावणे यांनी खरपूस समाचार घेतला आहे.

अमोल मिटकरी यांना सणसणीत टोला

मला पदरात घ्या, असा फोन बजरंग सोनावणे यांनी अजित पवार यांना केल्याचा दावा मिटकरी यांनी केला होता. त्यावर सोनावणे यांनी सणसणीत चपराक लगावली आहे. अमोल मिटकरी हे अजित दादांच्या बंगल्यावरील ऑपरेटर आहेत का? कोण आहेत अमोल मिटकरी? असा सवाल बजरंग सोनावणे यांनी केला. कारण ऑपरेटर कडेच फोनचे रेकॉर्ड असते, असा टोला ही त्यांनी लगावला.

हे सुद्धा वाचा

तर बायको म्हणेल…

माझ्या बीड जिल्ह्यातील जनतेने खूप प्रेम केले आहे. माझ्या मनात जर काही पाप असेल तर मी घराच्या बाहेर पडताच जिल्ह्यातील जनता माझं तोंड चपलाने फोडेल. पवार साहेबांना सोडायचं म्हंटल्यावर माझे वडील मला कानसुलित मरतील.माझी बायको म्हणेल तुला खायला पण नाही, नाश्ता देखील नाही, अशी परिस्थिती होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

विधानसभेत 200 हून अधिक जागा

राजकारणाच्या पलिकडे काही विषय असतात, मात्र हे राजकारणावर का आणतात हे समजले नाही. कारखाना अडचणीत असेल किंवा चोर असेल तरी एवढा मोठा निर्णय घेणार नाही.ट्विट करण्याचा धनी किंवा त्याचा बोलविता धनी कोण आहे हे अमोल मिटकरी यांनी सांगावं, असे सोनावणे यांनी आवाहन केले.

विधानसभेत आमच्या 200 च्या वर जागा लागतील. आकडा सांगणे हे आमचा धंदा नाही.आमचं सरकार येणार म्हणजे येणार हे मी जबाबदारीने सांगतो. पक्ष जो माझ्यावर मराठवाड्यातील विधानसभेची जबाबदारी देईल तेवढं मी पार पाडेन. ऑपरेटरला उत्तर देणे हे खासदार म्हणून माझे काम नाही, असा टोला पण त्यांनी मिटकरी यांना हाणला.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.