‘आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं बघायचं वाकून…’ Beed शिवसेना जिल्हाध्यक्षाने फडणवीसांचे फोटो Banner वर झळकवले
मुस्लिम मौलाना यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेवण करतानाचे हे फोटो दर्शवून भाजप सत्तेसाठी आसुसला आहे, असा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे. बीडमध्ये लावण्यात आलेले हे बॅनर सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.
बीडः महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) एमआयएम शामिल होण्याचा प्रस्ताव आल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात असंख्य प्रतिक्रिया उमटत आहे. मुंबई-दिल्लीपासून जिल्हा आणि ग्रामीण पातळीवरही आरोप-प्रत्यारोप करणं सुरु आहेत. मराठावाड्यातील राजकारणात अत्यंत संवेदनशील समजल्या जाणाऱ्या बीड जिल्ह्यातही (Beed politics) याचे पडसाद उमटले. येथे शिवसेनेच्या नेत्याने देवेंद्र फडणवीसांवर निषाणा साधत त्यांचे काही फोटोच बॅनरवर झळकवले आहेत. मुस्लिम मौलाना यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) जेवण करतानाचे हे फोटो दर्शवून भाजप सत्तेसाठी आसुसला आहे, असा आरोप शिवसेना नेत्याने केला आहे. बीडमध्ये लावण्यात आलेले हे बॅनर सध्या मोठा चर्चेचा विषय ठरत आहे.
बीडमध्ये फडणवीसांचे पोस्टर्स
बीडमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असे समीकरण पहावयास मिळाले आहे. शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुस्लिम मौलानासोबत जेवण करतानाचे फोटो बॅनरवर छापले आहेत. सध्या हे बॅनर बीडच्या शासकीय विश्रामगृहासमोर लावण्यात आले आहेत. “आपलं ठेवायचं झाकून दुसऱ्यांचे बघायचे वाकून”… ही मराठवाड्यातील म्हण या बॅनरवर छापली आहे. तसेच सत्तेसाठी आसुसलेली भाजप पिलावळ अशा आशयाचे लिखाण या बॅनरवर करण्यात आले आहे. त्यामुळे बीडमध्ये शिवसेना- भाजपात वाद चिघळण्याची चिन्हे आहेत.
विनायक राऊतांचाही औरंगाबादेत फडणवीसांवर घणाघात
औरंगाबादमध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांचाही नुकताच दौरा झाला. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी फडणवीसांचे मौलवींसोबत जेवण करतानाचे फोटो दाखवले. देवेंद्र फडणवीस टोपी घालून इफ्तार पार्टीत सहभागी झाल्याचे ते फोटो असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच मुस्लिम मतांसाठ देवेंद्र फडणवीस देखील जनाब, मियाँ झाले होते, असा आरोप त्यांनी केला. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अल्पसंख्याक मोर्चाद्वारे आयोजित इफ्तार पार्टीच्या या पत्रिकेतही देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात आधी होते आणि त्यांच्या नावाच्या आधी जनाब लिहिलेले होते, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे. या फोटोंमध्ये देवेंद्र फडणवीस टोपी घालून बोहरा समाजाला संबोधित करत आहेत, असं विनायक राऊत यांनी सांगितलं. त्यापैकीच एक फोटो बीडच्या शिवसेना जिल्हाध्यक्षांनी बॅनरवर छापला आहे.
इतर बातम्या-