दारूनं घात केला, आईनं जीव दिला, वडील तुरुंगात, लेकरांच्या डोक्यावरचं छत हरपलं, बीडमध्ये दुःखद घटना!

दारुमुळे संसाराची कशी वाताहत होते, हे दर्शवणारी विदारक घटना बीडमध्ये नुकतीच घडली. दारूच्या आहारी गेलेल्या पतीच्या त्रासाला कंटाळून एका विवाहितेने आत्महत्या केली. या प्रकरणी पतीला तुरुंगात जावे लागले. पण या दाम्पत्याच्या अपत्यांवरचे मायेचे छत कायमचे हरपले.

दारूनं घात केला, आईनं जीव दिला, वडील तुरुंगात, लेकरांच्या डोक्यावरचं छत हरपलं, बीडमध्ये दुःखद घटना!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Nov 27, 2021 | 8:00 AM

बीडः पतीच्या सतत दारू पिण्यावरून पत्नीने कंटाळून गळफास घेतल्याची घटना (Suicide case) बीडमध्ये 23 नोव्हेंबर रोजी घडली. तिला आत्महत्येस प्रवृत्त करायला केल्याच्या आरोपाखाली वडील तुरुंगात गेले. आता या दाम्पत्याची दोन मुले आई-बापाच्या प्रेमाला पारखी झाली आहेत. बीड तालुक्यातील शिदोड येथील विवाहिता आत्महत्या प्रकरणातील हा प्रसंग हृदय पिळवटून टाकणारा ठरतोय.

23 नोव्हेंबरला आईनं जीवन संपवलं

राजश्री रंजित कदम या विवाहितेने 23 नोव्हेंबर रोजी पतीच्या सततच्या वाईट वर्तणुकीमुळे आत्महत्या केली. तिने पत्र्याच्या आडूला स्कार्फच्या मदतीने गळफास घेतला. रंजितला दारूचे व्यसन होते. त्यासाठी तो नेहमी राजश्रीला मारहाण करत असे. 23 रोजी त्याने राजश्रीकडे दारूसाठी पैसे मागितले होते. तिने नकार दिल्याने त्याने राजश्रीला बेदम मारहाण केली होती. राजश्रीचे वडील जनार्दन चव्हाण यांच्या तक्रारीवरून रंजितविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलिसात दाखल करण्यात आला. सध्या तो पोलीस कोठडीत आहे.

बापाच्या चुकीची लेकरांना शिक्षा

कदम दाम्पत्याला 13 आणि 10 वर्षांची दोन अपत्ये आहेत. सध्या आई आणि वडील दोघेही घरी नसल्याने या दोघांना शिदोड येथे आजी-आजोबांच्या आश्रयाला पाठवण्यात आले आहे. दारूपायी कदम दाम्पत्याच्या संसाराची अक्षरशः वाताहत झाली. या दोन चिमुकल्यांकडे पाहून नातेवाईकांचा जीव कासावीस होतो. बापाच्या चुकीची शिक्षा या निरागस लेकरांना भोगावी लागतेय, हे पाहून अनेकांचा कंठ दाटून येत आहे.

इतर बातम्या-

केंद्र सरकार संविधान बदलू पाहतंय, भाजपला कडाडून विरोध करा; सुप्रिया सुळेंचं आवाहन

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंचे सर्व अहवाल नॉर्मल, वयाच्या 85 व्या वर्षीही अण्णा तंदरुस्त

उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.