धक्कादायक | परीक्षा सुरु असतानाच दहावीच्या विद्यार्थीचा मृत्यू, Beed मध्ये खळबळ, हत्या की आत्महत्या?

कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल जप्त केला असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

धक्कादायक | परीक्षा सुरु असतानाच दहावीच्या विद्यार्थीचा मृत्यू, Beed मध्ये खळबळ, हत्या की आत्महत्या?
नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळलाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 11:48 AM

बीडः दहावीच्या परीक्षा सुरु असतानाच बीडमधील (Beed) एका विद्यार्थिनीचा गळफासाने मृत्यू (Girl Death) झाल्याची घटना समोर आली आहे. दहावीची परीक्षा देणाऱ्या या विद्यार्थीनीचा (10th student) मृतदेह पंख्याला लटकलेल्या अवस्थेत पाहून कुटुंबियांचा थरकाप उडाला. सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून सृष्टीने आत्महत्या करण्यासारखे काही कारणच नव्हते, असे कुटुंबियांनी सांगितले. त्यामुळे तिने आत्महत्या केली आहे की हत्या, याचा तपास आता पोलीस करत आहेत. सृष्टी इतर विद्यार्थ्यांप्रमाणे दहावीची परीक्षा देत होती. तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते. मात्र तिचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.

मामाकडे होती वास्तव्यास

सृष्टी रोहिदास काळे असं या मृत विद्यार्थिनीचं नाव असून ती सोळा वर्षांची होत. सृष्टीची दहावीची परीक्षा सुरु होती. ती बीडमधील छत्रपती कॉलनीत वास्तव्यास होती. मात्र सोमवारी रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आडलला. नातेवाईकांन पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. सृष्टीचा मृतदेह काढण्यात आला आणि पुढे शवविच्छेदनासाठी देण्यात आला. शिवाजी नगर पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून ते पुढील तपास करत आहेत.

मोबाइल जप्त, तपास सुरू

दरम्यान, सृष्टीने आत्महत्या केली आहे की तिची हत्या झाली आहे, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. कारण कुटुंबियांशी केलेल्या प्राथमिक चौकशीतून तिने आत्महत्या करण्यासारखे काही कारण नव्हते, अशी माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी सृष्टीचा मोबाइल जप्त केला असून या प्रकरणी शिवाजी नगर पोलीस पुढील तपास करत आहेत.

इतर बातम्या-

Bhor electricity issue : नागरिकांच्या संयमाचा अंत! वीज गायब झाल्यानं मध्यरात्री वीजनिर्मिती केंद्रात धडक

Weather Alert | मराठवाडा, विदर्भात उष्णतेची लाट, पारा 44 अंशावर जाण्याची शक्यता, घराबाहेर पडणे टाळा!

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.