आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड पुढच्या 24 तासांत सरेंडर होणार?

आताच्या घडीची मोठी बातमी समोर येत आहे. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या 24 तासांत पोलिसांकडे सरेंडर होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. कारण सीआयडीकडून तितकी कठोर कारवाई केली जात आहे.

आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, वाल्मिक कराड पुढच्या 24 तासांत सरेंडर होणार?
वाल्मिक कराड
Follow us
| Updated on: Dec 29, 2024 | 8:35 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी वाल्मिक कराड हा पुढच्या 24 तासात सरेंडर होणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय. कारण संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीचे 9 पथक तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आरोपींचे मोबाईल डेटा सीआयडीने तपासल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. वाल्मिक कराड याच्याह फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. तसेच वाल्मिक कराड याच्या नातेवाईकांचीदेखील बँक खाती गोठवण्यात आली आहेत. वाल्मिक कराड याचंही बँक खातं गोठवण्यात आलं आहे, अशी देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. काही ठिकाणाहून अशी देखील माहिती समोर येत आहे की, वाल्मिक कराड हे सरेंडर देखील होऊ शकतात.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने 9 पथकं तयार केली आहेत. यामध्ये 150 पेक्षा जास्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. या सर्वांकडून आता संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. स्कॉर्पिओ गाडीत सापडलेले मोबाईल प्रयोगशाळेत पाठवले आहेत. त्यांचा अहवाल अद्याप आलेला नाही. पण या प्रकरणातील सर्व कॉल, व्हाट्सअप कॉल हे सर्व तपासण्याचं काम सीआयडीकडून सुरु आहे. हे काम सुरु असतानाच वाल्मिक कराड यांचं बँक खातं देखील गोठवण्यात आलं आहे. त्याचबरोबर इतर आरोपींचीदेखील बँक खाते गोठवण्यात आले आहेत. तसेच आरोपींच्या नातेवाईकांचे देखील बँक खाते गोठवण्यात आल्याची शक्यता आहे. या सर्व कारवाईनंतर वाल्मिक कराड पुढच्या 24 तासात स्वत:ला सरेंडर करणार का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

सीआयडीने काय-काय कारवाई केली?

आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांची चौकशी करण्यात आली आहे. फरार आरोपींच्या संपर्कात जी लोकं होती त्यांची सर्वांची कसून चौकशी करण्यात आलेली आहे. मोठ्या प्रमाणात कारवाई देखील केली जात आहे. त्यामुळे वाल्मिक कराड सरेंडर होणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या दोन मोबाईलमध्ये काही महत्त्वाचा डेटा आणि व्हिडीओदेखील मिळाल्याची सूत्रांची माहिती आहे.

हे सुद्धा वाचा

संबंधित मोबाईल हे तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल अद्याप मिळालेला नाही. पण त्या मोबाईलमधून अनेक धागेदोरे मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॉल डिटेल्स, व्हिडीओ कॉल्स, व्हाट्सअप कॉल यांची माहिती मिळणार आहे. तसेच त्या मोबाईलमध्ये जे व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले होते त्याची सुद्धा महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे. या प्रकरणी आता काय-काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं आहे.

'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?
'बजरंगाच्या छातीत राम तर माझ्या छातीत शरद पवार', झिरवाळ काय म्हणाले?.
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध
'केरळ मिनी पाक', नितेश राणेंच्या त्या वक्तव्याचा केरळच्या CMकडून निषेध.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'
नववर्षाच्या पहिल्या दिवशी राज ठाकरेंकडून आदेश,'माझ्या मनसैनिकांनो...'.
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?
मस्साजोगच्या ग्रामस्थांचं सामूहिक जलसमाधी आंदोलन, मागणी नेमकी काय?.
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी
भक्तीभावानं नवं वर्षाचं स्वागत; पंढरपूर, शिर्डीत भाविकांची मोठी गर्दी.
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य
नवं वर्ष, नवा उत्साह, नवी उमेद; 2025च्या पहिल्या सूर्योदयाची खास दृश्य.
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका
मुख्यमंत्री, मुंडेंशी चर्चा अन् वाल्मीक कराडच्या 'सरेंडर'वरून शंका.
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?
Santosh Deshmukh : वाल्मिक कराडचा व्हिडीओ, सरेंडर आधी नेमकं काय घडलं?.
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.