संजय राऊत यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल: शिवसेना राऊतांबद्दल आक्रमक

खासदार संजय राऊत यांच्यावर ठाण्यासह आता बीडमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याने शिवसेना आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

संजय राऊत यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल: शिवसेना राऊतांबद्दल आक्रमक
Follow us
| Updated on: Feb 23, 2023 | 11:55 PM

बीडः राज्यात सत्तांतर झाल्यापासून ठाकरे गटाला शिवसेनेच्या वेगवेगळ्या नेत्यांकडून धक्क्याधक्के देण्यात येत आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पदापासून पायउतार व्हावं लागले होते. त्यानंतर राज्यात सत्ताबदल होऊन शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. त्यानंतर शिंदे-फडणवीस सरकारचा सहा महिन्याचा कालावधी लोटल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी न्यायालयीन लढा देत शिवसेना पक्ष आणि चिन्ह हे दोन्हीही त्यांनी आपल्या गटाला मिळवून घेतले.

या न्यायालयाीन लढ्यानंतर खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या नेत्यांवर प्रचंड टीका केली जाऊ लागली.

शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर संजय राऊत यांनी न्यायालय सत्ताधाऱ्यांच्या खिशात म्हणत त्यांनी निवडणूक आयोगावरही हल्लाबोल केला होता.

त्यानंतर संजय राऊत यांनी थेट मुख्यमत्र्यांचे सुपुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर गंभीर आरोप त्यांनी आपल्याला जीवे मारण्याची सुपारी दिल्याचा आरोप केला आहे.

त्याबाबत त्यांनी पोलीस आयुक्तांसह मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनाही पत्र दिले आहे. संजय राऊत यांच्या या आरोपानंतर एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांनी राऊत यांच्यावर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

तर याच मुद्यावरून आता बीड जिल्ह्यातही संजय राऊत यांच्यावर पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

खासदार संजय राऊत यांच्यावर ठाण्यासह आता बीडमध्ये गुन्हा दाखल झाला असल्याने शिवसेना आता आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

तर ठाण्यात संजय राऊत यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाल्यानंतर असे अनेक गुन्हे दाखल झाले तरी मी घाबरणार नाही असा इशाराही संजय राऊत यांनी दिला होता.त्यामुळे आता शिंदे विरुद्ध राऊत हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.