Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ते तेली, माळी समाजाचे नेते म्हणून त्यांची घरे जाळली?’, भुजबळांचा आंदोलकांना सवाल

"एवढं झाल्यानंतर सरकारने काही लोकांच्या बदल्या केल्या. एवढंच नाही, गुन्हे मागे घ्यायला सांगितलं तर मागे घ्यायला सांगितलं. अशा रितीने पोलिसांना ट्रिटमेंट मिळत असेल, कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते, त्यामुळे पोलिसांनी करायचं म्हणून करा, असं केलं असेल. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे फेल ठरली", असं छगन भुजबळ म्हणाले.

'ते तेली, माळी समाजाचे नेते म्हणून त्यांची घरे जाळली?', भुजबळांचा आंदोलकांना सवाल
chhagan bhujbalImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Nov 06, 2023 | 6:16 PM

बीड | 6 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न-नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी आज मराठा आंदोलनावेळी जाळपोळ झालेल्या ठिकाणी भेट दिली. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. यावेळी त्यांनी नेतेमंडळींच्या घरे आणि कार्यालयांची जाळपोळ करणाऱ्या आंदोलकांवर सडकून टीका केली. तेली आणि माळी समाजाचे नेते आहेत, ओबीसी समाजाचे नेते आहेत त्यामुळे तुम्ही त्यांचे घरे आणि कार्यालये जाळली का? असा थेट सवाल छगन भुजबळ यांनी केला. यावेळी भुजबळांनी पोलिसांवरही प्रश्न उपस्थित केले. पोलिसांनी आंदोलकांचा प्रतिकार का केला नाही? असा सवाल छगन भुजबळ यांनी उपस्थित केला.

“माजी आमदार जयदत्त क्षीरसागर आणि विद्यमान आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरी लहान मुलांना अक्षरश: उंच असलेल्या भींती वरुन पलिकडच्या मुलांनी वाचवलं. मुस्लिम समाजाच्या आणि इतर समाजाच्या लोकांनी त्या भींतीवरुन लहान मुलांना ओढून घेतलं आहे. म्हणजे या आगीत ते सापडले असते तर ती मुलं वाचली नसती. आग कशासाठी लावण्यात आली होती?”, असा सवाल छगन भुजबळ यांनी केला.

‘ठरवून उद्रेक झाला’

“हे इतकं प्लॅनिंगने होतं की, माजलगावची टीम वेगळी आणि इथे नासधूस करणारी टीम वेगळी होती. प्रत्येकाला नंबर दिला होता. 1 नंबर झाला, 15 नंबर, 15 नंबर झाला, मग 22 नंबर, प्रत्येक ठिकाणी सांकेतिक नावं देण्यात आली होती. या सगळ्या प्लॅनने नासधूस करण्यासाठी सांकेतिक नावं देण्यात आली. ठरवून उद्रेक झाला. या घटनांमध्ये कमीत कमी जवळपास 700 ते 800 लोकांचा समावेश होता”, असा दावा छगन भुजबळांनी केला.

‘फक्त ओबीसींचे म्हणून त्यांचे घरे जाळायची’

“फक्त ओबीसींचे कार्यकर्ते आहेत म्हणून त्यांचे घरे जाळायची. जयदत्त क्षीरसागर आणि संदीप क्षीरसागर हे तर काहीच म्हणाले नव्हते. त्यांच्या घरी, ऑफिसमध्ये, शिक्षण संस्थेत कशाला जाळपोळ केली? तेली समाजाचे आहेत म्हणून? ओबीसींचे आहेत म्हणून? कशासाठी? माळी समाजाचा आहे म्हणून? प्रकाश सोळंके काय म्हणाले होते?”, असे अनेक सवाल छगन भुजबळांनी केले.

‘आरक्षण दिलं तरी सर्वच शंभर टक्के लोकांना फायदा होत नाही’

“आरक्षणाने सर्व विषय सुटत नसतात. हे खरंय. आरक्षण संघटनात्मक पद्धतीने आज 75 वर्षांपासून दलित समाजाला आहे. त्यातून एसपी झाले, कलेक्टर झाले. पण आजसुद्धा झोपडपट्ट्यांमध्ये दलित समाजच वावरतोय. गरीबी दूर झालेली नाही. काही टक्के लोकांना जरुर त्याचा फायदा मिळतोय. समाजात जो खालचा वर्ग आहे तो इतरांसोबत आणण्याचा हा कार्यक्रम आहे. हा गरीबी हटवण्याचा कार्यक्रमच नाही. दोन-तीन टक्क्याचा फायदा होतो. आरक्षण दिलं तरी सर्वच शंभर टक्के लोकांना फायदा होत नाही”, असं छगन भुजबळ म्हणाले.

’70 महिला-पुरुष पोलीस जखमी’

“मोठमोठे हत्यारं घेऊन घरे जाळली. या सगळ्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. पोलीस हतबल का झाली? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. एवढं सगळं पोलिसांना माहिती नव्हतं. पोलिसांनी काहीतरी प्रतिकार करायला हवा होता. पण कुठेही प्रतिकार केला नाही. याचं कारण ते पहिल्या दिवशी ज्यावेळेला उपोषणाला बसले होते, तिथे पोलिसांनी लाठीमार केला ती बाजू जनतेच्या समोर प्रकर्षाने समोर आली. पण आज तिथल्या एसपींचं स्टेटमेंट आलंय. त्यांनी सांगितलंय की, आमचे 70 महिला-पुरुष पोलीस जखमी झाले आहेत. एवढे पोलीस जखमी झाल्यानंतरही पोलीस प्रतिकार करत नाहीत”, असं भुजबळ म्हणाले.

‘पोलिसांवर हल्ला झाला हे लक्षात घेतलं पाहिजे’

“एवढं झाल्यानंतर सरकारने काही लोकांच्या बदल्या केल्या. एवढंच नाही, गुन्हे मागे घ्यायला सांगितलं तर मागे घ्यायला सांगितलं. अशा रितीने पोलिसांना ट्रिटमेंट मिळत असेल, कारवाई करणाऱ्या पोलिसांवर कारवाई होते, त्यामुळे पोलिसांनी करायचं म्हणून करा, असं केलं असेल. गुप्तचर यंत्रणा पूर्णपणे फेल ठरली आहे. पोलीस गेल्यानंतर अगोदर मारतील एवढं महाराष्ट्र पोलीस निर्दयी नाहीत. त्यांच्यावर हल्ला झाला हे लक्षात घेतलं पाहिजे. त्याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे. याची चौकशी कोण करणार? याची कडक चौकशी झाली पाहिजे”, अशी मागणी भुजबळांनी केली.

केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं
केईएम रुग्णालयाकडून 'माय मराठी'चा अवमान, शिवसैनिकांनी गेटला फासलं काळं.
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत
नागपुरात संचारबंदी कायम; 170 शाळा बंद, जनजीवन विस्कळीत.
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी
दगंलीचं विस्तव विझेल पण भडकाऊ वक्तव्यांच काय? फडणवीसांची राणेंना तंबी.
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे
विकासचा मृत्यू मारहाणीमुळेच; शवविच्छेदन अहवालातून धक्कादायक खुलासे.
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड..
औरंगजेब कबरीचा वाद सुरू अन् पुरातत्व विभागाकडून धक्कादायक माहिती उघड...
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर
लाडके असले तरी काहीही बोलायला मुभा नाही; नितेश राणेंना घरचा आहेर.
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर
नागपुरातील हिंसाचाराला जबाबदार कोण? राड्यातील मास्टरमाईंडचे नाव समोर.
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू
कामावरून घरी निघाले, रस्त्यातच अघटित घडलं अन्.. चौघांचा होरपळून मृत्यू.
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'
'गाडलेला औरंग्या पुन्हा जिवंत, कारण भाजपच्या 'पोटात' नवा शिवाजी...'.
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला
छावा कादंबरी 60 वर्षांपूर्वी आली पण.., कबरीवरून राज यांचा भाजपला टोला.