सीआयडीने कोर्टात संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण सांगितलं, धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?

आरोपींनी संतोष देशमुख यांची हत्या का केली? त्यामागचं कारण सीआयडीने आज कोर्टात सांगितलं. त्यानंतर वाल्मिक कराडला कोर्टाने सात दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली आहे. यानंतर आता संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया समोर आली आहे.

सीआयडीने कोर्टात संतोष देशमुखांच्या हत्येचं कारण सांगितलं, धनंजय देशमुख यांची पहिली प्रतिक्रिया काय?
धनंजय देशमुख
Follow us
| Updated on: Jan 15, 2025 | 6:39 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. आरोपी वाल्मिक कराड याला आज बीड कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी एसआयटी आणि सीआयडीने वाल्मिक कराड याच्या विरोधात मोठमोठे दावे करत त्याच्या 10 दिवसांची सीआयडी कोठडी मागितली. संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दिवशी वाल्मिक कराड हा इतर आरोपींच्या संपर्कात होता, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. तसेच संतोष देशमुख हे खंडणी प्रकरणात अडथळा ठरत होते म्हणून आरोपींनी कट रचून त्यांची हत्या केली. विशेष म्हणजे हत्येच्या दिवशी वाल्मिक कराडने संतोष देशमुखांना धमकी दिली होती, असा मोठा युक्तिवाद सरकारी वकिलांनी कोर्टात केला. यानंतर कोर्टाने वाल्मिक कराडला 7 दिवसांची सीआयडी कोठडी सुनावली. या सर्व घडामोडींनंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

“न्यायालयीन प्रक्रिया आहे. ती चालू राहणार आहे. आम्ही तपासासंदर्भात अपडेट घेतली. तपास योग्य दिशेने सुरू आहे. आम्हाला विश्वासात घेतलं की योग्य दिशेने तपास सुरू आहे”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. यावेळी देशमुखांना वाल्मिक कराड आणि इतर आरोपींच्या फोन कॉलचे पुरावे कोर्टात सादर करण्यात आले. त्याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “साधारण त्याचवेळेत ही घटना घडली होती. दुपारी सव्वा तीनच्या नंतर ते संध्याकाळी साडेसहा वाजेपर्यंत फोन कॉल झाला. दोन-तीन तासांचा तो कालावधी आहे. योग्य दिशेने तपास आहे. तपास बाकी आहे. त्यामुळे त्या तपासाकडे आपले लक्ष आहे. काय काय कनेक्शन सापडतात ते समोर येईल”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

‘हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा द्या’

वाल्मिक कराडच्या वकिलांनी केलेल्या दाव्याबाबत धनंजय देशमुख यांना प्रश्न विचारला असता, “आपण त्यावर बोलणार नाही. तो तपासाचा भाग आहे. ते कोर्टात स्पष्टीकरण देतील. तो युक्तिवाद आहे. आपण न्याय मागतोय. न्याय आपण यंत्रणेला मागितला आहे. आपली न्यायाची भूमिका आहे. आपण न्याय मागतोय वकिलाच्या युक्तिवादात जाण्याची गरज नाही. त्यांचे ते काम करतात. आरोपी कोण आहे, सहआरोपी कोण आहे, ज्यांनी हत्या केली त्यांना फाशीची शिक्षा द्या. यावर आपण ठाम आहोत. न्यायालयीन गोष्टींचा भाग असल्यामुळे त्यावर जास्त बोलणे उचित नाही”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

सीआयडी अधिकाऱ्यांसोबत काय चर्चा?

धनंजय देशमुख यांनी आज सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. याबाबतही त्यांनी प्रतिक्रिया दिली. “सीआयडी अधिकाऱ्यांना आज सहज भेटलो. तपासाबाबत माहिती घेतली आणि निघून आलो. एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली यांची कालच भेट घेतली होती. त्यामुळे आज परत भेट घेण्याची गरज वाटली नाही”, असं धनंजय देशमुख यांनी सांगितलं. “कोर्टात पण असंच गेलो होतो. प्रत्येक गोष्टीचा थोडा आढावा आपल्याकडे असणं अपेक्षित आहे. आज आम्ही कोर्टात जवाब दिला नाही. ते आजच्या तारखेचा स्पष्टीकरण येईल, उद्या जवाब देणार आहेत का ते नक्की नाही ज्या दिवशी तारीख देतील त्या दिवशी देणार आहोत”, असं देखील धनंजय देशमुख यांनी सांगितलं.

मनोज जरांगेंच्या भेटीत काय चर्चा?

धनंजय देशमुख यांनी मराठा नेता मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता, “काही चर्चा होणार नाही. सहज जाऊन चक्कर मारून दादांना भेटून येतो. ज्यावेळेस आम्हाला वाटेल दादांची भेट घ्यायची त्यावेळेस आम्ही घेतो”, अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी दिली.

सुरेश धस यांच्यावर केल्या जाणाऱ्या आरोपांवर काय म्हणाले?

वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून भाजप आमदार सुरेश धस यांच्यावर आरोप केले जात आहेत. यावरही धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. “त्याच्या भूमिकेत हे सगळे आहेत. त्यांनी न्याय मागितला आहे. न्याय मागणाऱ्या लोकांना कोणी ब्लेम करत असेल तर चुकीचं आहे. न्याय मागताना त्यांची भूमिका न्यायाची आहे, त्यांच्या भावना न्यायाच्या आहेत. जे सगळे लोकप्रतिनिधी आहेत, विविध संघटनांमधील लोक, हे न्यायाच्या भूमिकेत आहेत आणि न्याय मागत आहेत”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

परळीतील आंदोलनावर काय म्हणाले?

यावेळी त्यांनी परळी वाल्मिक कराडच्या समर्थकांकडून केल्या जाणाऱ्या आंदोलनावरही प्रतिक्रिया दिली. “प्रशासनाने त्याच्यावर विचार केला पाहिजे. हे काय चाललंय काय आणि हे कशासाठी आहे? तो त्यांचा पार्ट आहे आपला पार्ट न्याय मागणं आहे”, असं धनंजय देशमुख म्हणाले.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.