‘मी स्वत:ला संपवून घेईन’, बजरंग सोनवणे यांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी

बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिली. सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली. "कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन", असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं.

'मी स्वत:ला संपवून घेईन', बजरंग सोनवणे यांची निवडणूक अधिकाऱ्याला धमकी
बीडचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे
Follow us
| Updated on: Jun 02, 2024 | 4:54 PM

बीड लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे उमेदवार बजरंग सोनवणे आज चांगलेच आक्रमक झाले. बजरंग सोनवणे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना स्वत:ला संपवून घेण्याची धमकी दिली. सोनवणे यांनी निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना धमकी दिली. “कांबळे साहेब हात आकडू नका. अन्यथा मी स्वत:ला संपवून घेईन”, असं वक्तव्य बजरंग सोनवणे यांनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. स्ट्राँग रुमच्या पाहणीदरम्यान बजरंग सोनवणे यांनी संबंधित वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राकारणात काय-काय घडामोडी घडतात ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बजरंग सोनवणे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी आपली भूमिका मांडली. “मी काय बोललो हा विषय नाही. त्यांनी लोकशाही जिवंत ठेवली नाही तर बीड जिल्हा काय म्हणेल? त्यांनी लोकशाही जिंवत ठेवावी, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिली”, असं बजरंग सोनवणे म्हणाले.

‘…म्हणून स्टाँग रुमला आलो’

“स्ट्राँग रुमला येण्याचं कारण हे की, जिल्हाधिकारी इथे आहेत. त्यांच्याशी मला काही चर्चा करायची आहे. त्यामुळे मी इथे आलो आहे. त्यांनी मला काही गोष्टी विचारल्या आहेत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्षात येऊन बोलतो, असं म्हणालो. याशिवाय स्टाँग रुमच्या पाहणीसाठी इथे आलो आहे”, अशी प्रतिक्रिया बजरंग सोनवणे यांनी दिलं.

बजरंग सोनवणे आणखीय काय म्हणाले?

  • जिल्हाधिकारी दीपा मुधोळ यांना मी वयक्तिक पत्र देवून तक्रार केली होती. त्याला आता खूप वेळ झाला आहे.
  •  मतदानाची प्रक्रिया पारदर्शक पार करेल अशी खात्री मला जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
  •  जिल्ह्यातील सर्व जातीधर्मातील लोकांनी सलोखा राखून शांततेत राहिले पाहिजे.
  •  41 उमेदवारांपैकी मीच निवडून येणार आहे.
  •  निवडणूक अधिकारी महेंद्र कांबळे यांना मी अनेक तक्रारी केल्या होत्या. ते एकतर्फी वागतात असे माझे मत झाले आहे.
  • कांबळे आणि पोलीस प्रशासनाचे एकमत दिसत नाही.
  •  स्ट्राँग रूममध्ये देखील लोकप्रतिनिधींच्या एजंटसाठी बसण्याची जागा अपुरी आहे.
  • इथे चेंगराचेंगरी झाल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? सांगून देखील प्रशासन ऐकत नव्हते म्हणून मला जीव संपविण्याची भाषा करावी लागली.
  • कौल कोणाचा, काय आहे माहीत नाही. मात्र माझा विजय निश्चित आहे. बीड जिल्ह्यातील संस्कृती आणि रसायन वेगळे आहे. खासदार मात्र मीच होणार.

बीडमध्ये नेमकी राजकीय परिस्थिती काय?

बीड लोकसभा मतदारसंघात भाजपकडून पंकजा मुंडे या लोकसभेच्या मैदानात आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून बजरंग सोनवणे आहेत. बजरंग सोनवणे यांनी गेल्या निवडणुकीतही खासदार प्रीतम मुंडे यांना टफ फाईट दिली होती. तसेच या निवडणुकीतही बीडमध्ये चुरशीची लढत झाली आहे. पण एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, बीड लोकसभा मतदारसंघात पंकजा मुंडे या जिंकून येण्याची शक्यता आहे. पंकजा मुंडे यांना त्यांचे बंधू मंत्री धनंजय मुंडे यांचीदेखील या निवडणुकीत साथ लाभली. त्यामुळे त्यांची ताकद दुप्पट झाली. आता येत्या 4 तारखेला कोण बीडमध्ये खरी बाजी मारतं ते स्पष्ट होणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.