Mhada Recruitment : म्हाडाच्या परीक्षेत डमी उमेदवाराला बेड्या, बीडच्या परीक्षा केंद्रावर पोलिसांच्या सतर्कतेनं डाव फसला
म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेण्याचं ठरवलं होतं. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमध्ये (Beed) आज म्हाडाची परीक्षा पार पडतेय.

बीड : म्हाडामध्ये एकूण 565 पदांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले होते. म्हाडाची परीक्षा यापूर्वी ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात येणार होती. मात्र, परीक्षेत गैरप्रकाराचा संशय आल्यानं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मध्यरात्रीच्या वेळी लेखी परीक्षा रद्द करत असल्याची घोषणा केली होती. म्हाडानं त्यानंतर परीक्षा आयोजन करण्यासाठी टीसीएसची मदत घेण्याचं ठरवलं होतं. 31 जानेवारी, 2 फेब्रुवारी, 3, 7 , 8 ,9 फेब्रुवारी या 7 दिवशी परीक्षांचं आयोजन करण्यात आलं आहे. बीडमध्ये (Beed) आज म्हाडाची परीक्षा पार पडतेय. या परीक्षेत दुसऱ्याच्या नावाने परीक्षा (Mhada Exam) देणाऱ्या एका डमी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलीय. राहुल सानप हा मूळ परीक्षार्थी होता. मात्र त्याच्या जागी अर्जुन बिगोत हा डमी विध्यार्थी परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी डमी विद्यार्थ्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.
डमी विद्यार्थ्याकडून मोबाईल बॅटरी मायक्रो हेडफोन जप्त
बीड मध्ये आज म्हाडाची परीक्षा पार पडतेय. या परीक्षेत दुसऱ्याच्या नावाने परीक्षा देणाऱ्या एका डमी विद्यार्थ्याला पोलिसांनी अटक केलीय. राहुल सानप हा मूळ परीक्षार्थी होता मात्र त्याच्या जागी अर्जुन बिगोत हा डमी विध्यार्थी परीक्षा देत होता. त्याच्याकडून एक मोबाईल बॅटरी, कानातला मायक्रो हेडफोन आणि काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केले आहे. दरम्यान शिवाजी नगर पोलिसांनी डमी विद्यार्थ्याला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे, अशी माहिती पोलीस कर्मचारी संगीता शिरसाट यांनी दिली आहे.
राज्यातील 106 केंद्रावर परीक्षा
म्हाडाची ऑनलाईन परीक्षा कालपासून सुरु झाली आहे. राज्यभरात106 केंद्रावर ऑनलाईन परीक्षा होतीय. 2 लाख 60 हजार विद्यार्थी या परीक्षेला बसलेत. 565 पदांसाठी म्हाडाची भरती होत आहेत. म्हाडाच्या विविध संवर्गातील 565 पदासाठी ऑनलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यासाठी म्हाडा आणि टीसीएस (टाटा कन्सल्टंटसी सव्र्हिसेस) नं तयारी केली आहे.
कोणत्या पदांसाठी भरती प्रक्रिया
कार्यकारी अभियंता (स्थापत्य) 13 जागा, उप अभियंता (स्थापत्य) 13 जागा, मिळकत व्यवस्थापक/ प्रशासकीय अधिकारी 02 जागा, सहायक अभियंता (स्थापत्य) 30 जागा, सहायक विधी सल्लागार 2 जागा, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) 119 जागा , कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ सहायक 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक 44 जागा, सहायक 14 जागा, वरिष्ठ लिपीक 73 जागा, कनिष्ठ लिपीक- टंकलेखक 207 जागा, लघूटंकलेखक 20 जागा, भूमापक 11 जागा आणि अनुरेखक 07 अशा एकूण 565 जागांवर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
इतर बातम्या :
ही कसली दुश्मनी? शॉर्टसर्किटमुळे नव्हे तर शेजाऱ्यानेच लावली ऊसाला काडी
OBC Reservation | ओबीसी आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी का केली नाही सही, भुजबळ म्हणतात…!