जनावराच्या गोठ्याला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान, बीडमधील अर्धपिंपरी येथील घटना

जनावाराच्या (Cattle) गोठ्याला अचानक आग (Fire) लागल्याची घटना बीड जिल्ह्यातील अर्धपिंपरीमध्ये (ardhapimpri) घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत दोन जनावरे दगावली असून, पाच शेळ्या आणि एक वासरू आगीमध्ये होरपळल्याने जखमी झाले आहे.

जनावराच्या गोठ्याला भीषण आग; आगीत लाखो रुपयांचे नुकसान, बीडमधील अर्धपिंपरी येथील घटना
जनावरांच्या गोठ्याला आग
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 10:43 PM

बीड : जनावाराच्या (Cattle) गोठ्याला अचानक आग (Fire) लागल्याची घटना बीड जिल्ह्यातील अर्धपिंपरीमध्ये (ardhapimpri) घडली आहे. या आगीत शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेत दोन जनावरे दगावली असून, पाच शेळ्या आणि एक वासरू आगीमध्ये होरपळल्याने जखमी झाले आहे. दादासाहेब लक्ष्मण यमगर असे या शेतकऱ्याचे नाव आहे. यमगर यांच्या घराशेजारील गोठ्याला अचानक आग लागली. आगीची घटना कळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन, आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्ररुप धारण केल्याने या घटनेत दोन जनावरे दगावली तर पाच शेळ्या जखमी झाल्या आहेत. आग नियंत्रणात आल्याची माहिती ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आली आहे. दरम्यान ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

लाखो रुपयांचे नुकसान

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दादासाहेब यमगर हे अर्धपिंपरी परिसरातील शेतवस्तीवर वास्तव्यास आहेत. ते शेतीसोबतच जोडधंदा म्हणून गुरांचे पालन देखील करतात. आज दुपारच्या सुमारास त्यांच्या घराच्या शेजारी असलेल्या जनावाराच्या गोठ्याला अचानक आग लागली. या घटनेत यमगर यांचे मोठे नुकसान झाले आहे. आगीमध्ये जळून दोन जनावरे दगावली आहेत, तर पाच शेळ्या आगीत होरपळ्याने जखमी झाल्या आहोत. या घटनेत यमगर यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून घटनेचा पंचनामा

दरम्यान घटनेची माहिती मिळताच पशुसंवर्धन वैद्यकीय अधिकाऱ्यांसह मंडळ अधिकारी, सरपंच आणि उपसरंपच यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानाचा आढावा घेतला. पशुसंवर्धन अधिकाऱ्याच्या उपस्थितीत मृत जनावरांचे शवविच्छेदन करून घटनेचा पंचनामा करण्यात आला. उन्हाळा सुरू झाला असून, उन्हाळ्यात अनेक ठिकाणी आगीच्या घटना घडत असतात. अशाप्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी काय खबरदारी घ्यावी याबाबत पशुसंवर्धन अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

महत्त्वाच्या बातम्या

Thane Crime : बनावट दारूच्या बॉटलचे झाकण बनवणाऱ्या कंपन्यांवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई

Jammu-Kashmir : काश्मिर खोर्‍यात दहशतवाद्यांचा उच्छाद सुरूच; आणखी एका सरपंचाची हत्या

देवदर्शन करुन परतणाऱ्यांवर काळाचा घाला! अक्कलकोट-गाणगापूर रोडवर भीषण अपघात, 5 जण जागीच ठार

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.