काय राव गुरुजी, तुम्हीही जुगारात? संताप व्यक्त करावा की आश्चर्य? जिल्हा परिषदेने दिला दणका!

 शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. येथे ज्या 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही लोक शिक्षक असल्याचे आढळून आले. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

काय राव गुरुजी, तुम्हीही जुगारात? संताप व्यक्त करावा की आश्चर्य? जिल्हा परिषदेने दिला दणका!
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Jan 07, 2022 | 3:59 PM

बीडः  शहरात काही दिवसांपूर्वी पोलिसांनी जुगाराच्या अड्ड्यावर धाड टाकली. येथे ज्या 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले त्यातील काही लोक शिक्षक असल्याचे आढळून आले. शहरात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. विद्यार्थ्यांना आदर्शाचे धडे देणाऱ्या शिक्षकांनीच अशा प्रकारचे वर्तन केल्यामुळे त्यांना बडतर्फ करण्याची मागणी जोर धरत होती. अखेर बीड जिल्हा परिषेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार यांनी पाच शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.

पाच निलंबित शिक्षक कोण?

सहाय्यक पोलीस अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने चऱ्हाटा फाटा परिसरात एका जुगार अड्ड्यावर 29 डिसेंबर रोजी कारवाई करीत 50 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले होते. आरोपींमध्ये जिल्हा परिषदेचे पाच शिक्षक असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. यात शिक्षक हरिदास जनार्दन घोगरे, भगवान आश्रुबा पवार, भास्कर विठ्ठल जायभाय, अशोक रामचंद्र सानप, बंडू किसन काळे यांचा समावेश आहे.

बडतर्फीची मागणी

विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षकच जुगारी असतील तर विद्यार्थ्यांवर काय परिणाम होईल, असा प्रश्न या प्रकरणानंतर उपस्थित जाला. तसेच या शिक्षकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत होती. सामाजिक कार्यकर्ते गणेश ढवळे यांनी या शिक्षकांना बडतर्फ करण्याची मागणी केली होती. दरम्यान मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

इतर बातम्या-

IND vs SA: नवीन कॅप्टन  केएल राहुलच्या निर्णयांवर गावस्करांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, मांडलं रोखठोक मत

86 व्या वर्षी वडिलांनी मॅरेज ब्युरोत नाव नोंदवलं, पुण्यात पोराने बापालाच संपवलं

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.