तुम्ही मोठ्या नेत्या आहात तर हे करून दाखवा; धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना आव्हान

माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं.

तुम्ही मोठ्या नेत्या आहात तर हे करून दाखवा; धनंजय मुंडे यांचे पंकजा मुंडे यांना आव्हान
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Mar 11, 2023 | 6:14 PM

बीड : परळी Ac मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून प्रामाणिकपणे विकास कामे खेचून आणण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु विनाकारण यावरून टीका टिप्पण्या केल्या जात आहेत. मी एमआयडीसी आणली. तुम्ही एवढ्या मोठ्या नेत्या आहात तर या एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणून दाखवा, असे आपले ओपन चॅलेंज आहे. असा टोला धनंजय मुंडे यांनी लगावला आहे. परळी तालुक्यातील इंदपवाडी व जीरेवाडी येथे जलजीवन कामाचा भूमिपूजन कार्यक्रम झाला. यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांच्यावर जोरदार टीका केली. पंकजा मुंडे यांच्या काळात पाच वेळा भूमिपूजन झालेल्या बायपासचे काम रखडले होते. ते आपण अवघ्या दीड वर्षात पूर्ण केल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगितले. तसेच जलजीवन मिशनच्या कामाचा संपूर्ण आराखडा आपण पालकमंत्री असल्याचा कार्यकाळात केला. एमआयडीसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आपण मंजूर करून आणला आहे. निदान या एमआयडीसीच्या प्रकल्पात आपले वजन वापरून एखादा मोठा प्रकल्प आणून दाखवावा असे आपले ओपन चॅलेंज असल्याचे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

बायपासमुळे जमिनीचे भाव वाढले

धनंजय मुंडे म्हणाले, माझं सरकार नसताना पाच वेळी भूमिपूजन झालं. एका टोकाला, जिरेवाडी, टोकवाडीतून, मध्यंतरी एकदा अशी भूमिपूजनं झालीत. पण, काम झालं नाही. त्यावेळी आमदार झाल्यानंतर बायपास रद्द करावं लागलं. दुसरं टेंडर करावं लागलं. काम सुरू झाल्यापासून दीड वर्षाच्या आत हा बायपासचा रस्ता पूर्ण केला. बायपासच्या अगोदर आणि आता जमिनीचे भाव किती आहेत, असा प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला. त्या जमिनीचे भाव चार कोटी रुपये एकर आहेत. आपण जमीन कसताना याचा विचार केला होता का. हा बदल असल्याचंही धनंजय मुंडे म्हणाले. विकास झाल्यानंतर जमिनीची किंमत वाढली पाहिजे, असंही त्यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

एमआयडीसीत एक मोठा प्रकल्प आणून दाखवा

फुकटचा वारसा घेऊन सगळं त्याच्यावर असा नाही. माझ्या दृष्टीने माणूस मोठा झाला पाहिजे. माझ्या मातीतला माणूस मोठा झाला पाहिजे. हे गोपीनाथ मुंडे यांचं स्वप्न होतं. ते मी पूर्ण करत आहे. होत नाही. जलजीवन मिशनचा आराखडा मी पालकमंत्री असताना केला आहे. एका गावाच्या विकास योजनेला १३ कोटी रुपये दिले. ते मी पालकमंत्री असताना. तांत्रिक मान्यता मी मंत्री असताना मिळाल्या आहेत. मी एमआयडीसी आणली. तुमचं राज्यात, देशात सरकार आहे. एमआयडीतीत एक मोठा प्रकल्प तुमच्या ऐपतीवर आणून दाखवा. तुम्ही म्हणाल ते राजकारणात करायला तयार असल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.