Beed Crime : बीडमधील ‘त्या’ जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू, नातेवाईकांची आरोपीच्या अटकेची मागणी

| Updated on: Jan 15, 2022 | 6:56 PM

मयत संभाजी वडजकर यांचे त्यांच्या भावासोबत शेतीच्या वादातून एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणातून संभाजी यांच्या भावाने त्यांना जबर मारहाण केली होती. मारहाणीनंतर तेलगाव-धारुर रोडवर संभाजी यांना फेकून देण्यात आले होते.

Beed Crime : बीडमधील त्या जखमी शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृ्त्यू, नातेवाईकांची आरोपीच्या अटकेची मागणी
तामिळनाडूत सहा महिन्यांच्या गर्भवती शाळकरी मुलीचा मृत्यू
Follow us on

बीड : महिनाभरापूर्वी भावाने केलेल्या मारहाणीत जखमी झालेल्या त्या शेतकऱ्याचा आज अखेर उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. संभाजी वडजकर असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी मारहाणीनंतर वडवणी पोलीस ठाण्यात 307 कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र कुणालाही अटक करण्यात आली नव्हती. शेतकऱ्याच्या मृत्यूनंतर नातेवाईकांनी आरोपीला अटक केल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे.

शेतीच्या वादातून भावाकडून झाली होती मारहाण

मयत संभाजी वडजकर यांचे त्यांच्या भावासोबत शेतीच्या वादातून एक महिन्यापूर्वी भांडण झाले होते. या भांडणातून संभाजी यांच्या भावाने त्यांना जबर मारहाण केली होती. मारहाणीनंतर तेलगाव-धारुर रोडवर संभाजी यांना फेकून देण्यात आले होते. आरोपीने संभाजी यांचा अपघाती मृत्यू भासवण्यासाठी हे कृत्य केले होते. मात्र जखमी अवस्थेत आढळलेल्या संभाजी यांना पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले. यानंतर त्यांच्याकडे याप्रकरणी विचारपूस केली असता त्यांनी घडला प्रकार पोलिसांसमोर कथन केला. यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात 307 कलम प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

नातेवाईकांचा आक्रमक पवित्रा

संभाजी यांच्यावर गेल्या एक महिना उपचार सुरु होते. मात्र दुर्दैवाने ते यातून वाचू शकले नाहीत. त्यांच्या पश्चात पत्नी आणि पाच मुले आहेत. संभाजी यांच्या मृत्यूची बातमी कळताच नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात एकच गर्दी केली. आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा नातेवाईकांनी घेतला आहे. याप्रकरणी वडवणी पोलीस पुढील कार्यवाही करीत आहेत.

यवतमाळमधील डॉ. धर्मकारे हत्या प्रकरणाचा उलगडा

चार दिवसांपूर्वी यवतमाळमध्ये राजाराम प्रभाजी उत्तरवार शासकीय रुग्णालयातील डॉक्टर हनुमंत धर्मकारे यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा करण्यास पोलिसांना यश आले आहे. डॉ. धर्मकारे यांनी रुग्णालयात ड्युटीवर असताना एका अपघातग्रस्त रुग्णावर उपचार केले होते. मात्र त्या रुग्णावर योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू झाला होता. याच रागातून डॉ. धर्मकारे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. 11 जानेवारीला डॉ. हनुमंत धर्मकारे यांची उमरखेड शहरातील साकळे विद्यालयासमोर गोळ्या झाडून हत्या (murder case) करण्यात आली होती. (Injured farmer in Beed dies during treatment, Relatives demand arrest of accused)

इतर बातम्या

Yavatmal shooting case | उमरखेड येथील डॉक्टरांवरील गोळीबार प्रकरणी चार आरोपी जेरबंद; दहा पथकांनी कशी केली कारवाई?

Pune Suicide : पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्याची गळफास घेत आत्महत्या, नैराश्येतून उचलले टोकाचे पाऊल