Ladki Bahin Yojana : या बहिणीचे कौतुक करु तरी किती! लाडक्या बहिणी योजनेतून सुरू केला व्यवसाय, असा कमावला नफा

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून काही बहि‍णींनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही बहि‍णींना या पैशांचा उपयोग झाला आहे. बीडमधील या ताईंने अशीच यशोगाथा लिहिली आहे. काय आहे ही Success Story?

Ladki Bahin Yojana : या बहिणीचे कौतुक करु तरी किती! लाडक्या बहिणी योजनेतून सुरू केला व्यवसाय, असा कमावला नफा
लाडकी बहीण योजनेची अशी पण यशोगाथा
Follow us
| Updated on: Sep 22, 2024 | 4:03 PM

महायुती सरकारची लाडकी बहीण योजना सध्या चांगलीच चर्चेत आहे.  मध्यप्रदेश सरकारच्या धरतीवर ही योजना राज्यात सुरू करण्यात आली. या योजनेत दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन सरकारने दिले. या योजनेचे दोन हप्ते लाडक्या बहिणींच्या खात्यात 15 ऑगस्टनंतर जमा झाले. आता तिसरा हप्ता या महिना अखेर देण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.  या योजनेवर विरोधकांकडून टीका झाली.  विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने ही योजना सुरू केल्याचा आरोप करण्यात आला. जनआधार गमावल्यानेच अशा योजना आणण्यात येत असल्याची टीका महाविकास आघाडीकडून करण्यात आली.  मात्र तळागाळातील महिलांना योजनेचा मोठा फायदा झाला. यातून काही सकारात्मक घडामोडीही समोर येत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. परळीतील एका महिलेने याच तीन हजार रुपयांमध्ये घरगुती लघुउद्योग सुरू केला आहे.

सुरू केला हा व्यवसाय

परळी शहरातील नेहरू चौक तळ विभागात राहणाऱ्या अक्षरा शिंदे यांनी ही यशोगाथा लिहिली आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी त्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली. त्यानंतर त्यांना या योजनेत 3000 रुपये प्राप्त झाले. हे पैसे इतरत्र ठिकाणी कुठेही खर्च न करता त्यांनी एक लघुउद्योग सुरू केला. आर्टिफिशल वटवृक्ष झाडे तयार केले. त्यांनी कृत्रिम वटवृक्ष या उद्योगाला सुरुवात केली. अक्षरा यांच्या सासू देखील या व्यवसायात त्यांना मदत करत आहेत. दीडशे रुपयांपासून दोन हजार रुपयांपर्यंत या झाडाची विक्री केली जाते आहे.

हे सुद्धा वाचा

असा झाला फायदा

गौरी/गणपती उत्सवात अक्षरा यांनी आर्टिफिशल वटवृक्षाची विक्री केली. त्यातून त्यांना खर्च वजा जाता 12 हजार रुपये प्राप्त झाले. ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहता हा व्यवसाय मोठा करण्याचा विचारात त्या आहेत. सणासुदीच्या दिवसात या आर्टिफिशियल वटवृक्षाला परळी, अंबाजोगाई, सोनपेठ, परभणी या ठिकाणाहून मोठी मागणी होत आहे.  त्यांच्या या व्यवसायाला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यामुळे व्यवसाय वाढीचा प्रयत्न अक्षरा शिंदे या करत आहेत.

'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
'पुतळ्याचे पैसे राणेंच्या निवडणुकीसाठी...', ठाकरे गटातील नेत्याचा आरोप.
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका
'संजय राऊत कपटी अन् रावणाच्या बुद्धिमत्तेचा माणूस', शहाजीबापूंची टीका.
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?
अजित पवारांनी आपल्याच नेत्याला खडसावलं? पण कारण नेमकं काय?.
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?
'अरे पठ्ठ्या लाडकी बहीण' योजना काय तुझ्या..'अजितदादांचा कोणावर निशाणा?.
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?
'दम नाही बुआ, नमस्कार'.... अजित पवार मिश्किलपणे नेमकं काय म्हणाले?.
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली
'लाडक्या बहिणीची दादांनी दखल घेतली नाही', महिला अजित पवारांवर भडकली.
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल
'संजय राऊत हे मानसिक रोगी, ते वेड्यासारखं...', भाजप आमदारांचा हल्लाबोल.
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा
'तर महागात पडेल हे विसरू नका', राज ठाकरेंचा पाक चित्रपटावरून थेट इशारा.
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?
तिरूपती मंदिरात हिंदू नाही तर ख्रिश्चन चेअरमन, कोणी गेला गंभीर आरोप?.
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा
तर नाच्यासारखा थयथयाट केला असता, जरांगेंचा छगन भुजबळांवर निशाणा.