सर्वात मोठी बातमी! बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून SIT स्थापन, मोठ्या घडामोडी

बीड सरपंच हत्या घटना प्रकरणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्य सरकारने या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना केली आहे. सरकारने 9 जणांच्या एसआयटीची स्थापना केली आहे. सरकारने याबाबत जीआर काढून घोषणा केली आहे.

सर्वात मोठी बातमी! बीड सरपंच हत्या प्रकरणाच्या तपासासाठी सरकारकडून SIT स्थापन, मोठ्या घडामोडी
Follow us
| Updated on: Jan 01, 2025 | 6:28 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात सरकारने एक महत्त्वाचं पाऊल उचललं आहे. या प्रकरणाच्या तपासासाठी राज्य सरकारने एसआयटीची समिती स्थापन केली आहे. या समितीत 9 पोलीस अधिकारी आहेत. आयपीएस बसवराज तेली यांच्या नेतृत्वात एसआयटीची स्थापना करण्यात आली आहे. बसवराज तेली सीआयडीमधील आर्थिक गुन्हे शाखेचे प्रमुख आहेत. एसआयटीमध्ये सर्वच अधिकारी बीड जिल्ह्यातले आहेत. सध्याचे तपास अधिकारी डीवायएसपी अनिल गुजर हेही तपास पथकात असणार आहेत.

एसआयटीमध्ये कोण कोण? वाचा संपूर्ण यादी

  • 1) अनिल गुजर, पोलीस उप अधीक्षक
  • 2) विजयसिंग शिवलाल जोनवाल, स. पो. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
  • 3) महेश विघ्ने, पो. उ. निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, बीड
  • 4) आनंद शंकर शिंदे, पो. उ. निरीक्षक, केज
  • 5) तुळशीराम जगताप, सहा. पो. उ.निरीक्षक
  • 6) मनोज राजेंद्र वाघ, पोलीस हवालदार
  • 7) चंद्रकांत एस. काळकुटे, पोलीस नाईक
  • 8) बाळासाहेब देविदास अहंकारे, पोलीस नाईक
  • 9) संतोष भगवानराव गित्ते, पोलीस शिपाई

तपासाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या घडामोडी

संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास आता आणखी वेगाने होतोय. राज्य सरकारने आरोपी वाल्मिक कराड याला पकडण्यासाठी त्याचे आर्थिकदृष्ट्या नाक आणि तोंड दाबण्याचा प्रयत्न केला. राज्य सरकारने त्याची संपत्ती जप्त केली. तसेच बँक खाते देखील गोठवले. यानंतर वाल्मिक कराड हा सीआयडीला शरण आला. विशेष म्हणजे गेल्या 22 दिवसांत वाल्मिक कराड हा मध्य प्रदेश, गोवा आणि कर्नाटक या राज्यांमध्ये फिरला. यानंतर तो महाराष्ट्रात पुण्यात आला. तो त्याच्या समर्थकांसह पुण्यात सीआयडी कार्यालयात सरेंडर होण्यासाठी काल दाखल झाला. त्याच्या समर्थकांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या. अखेर सीआयडी तपासातून कराड हा तीन राज्ये फिरल्याची माहिती समोर आली.

हे सुद्धा वाचा

वाल्मिक कराड याला केज कोर्टाने 14 दिवसांची कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले हा फरार आहे. त्याचा शोध पोलीस आणि सीआयडीचे पथक घेत आहेत. वाल्मिक कराड याच्या अटकेनंतर आता तो लवकर सापडेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. सीआयडीचे पथक सर्व कॉल रेकॉर्ड, सीडीआर युद्ध पातळीवर तपासत आहेत. आरोपींच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी सीआयडीच्या पथकाने जंग जंग पछाडलं आहे. 100 पेक्षा जास्त जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे.

बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या
बीड सरपंचाच्या हत्येची टीप देणाऱ्यासह 3 फरार आरोपींपैकी दोघांना बेड्या.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?
संतोष देशमुख हत्या प्रकरणात एका डॉक्टरलाच अटक, त्याची भूमिका काय?.
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी
मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दादांचे आमदार एकवटले?या आमदारांनी केली मागणी.
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी
'धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या',अजितदादांच्या या आमदारांची आग्रही मागणी.
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले...
राजन साळवी ठाकरेंची साथ सोडणार? पदाधिकाऱ्यांशी बोलल्यानंतर म्हणाले....
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक
'मैं अकेला चला था...', साताऱ्यात फडणवीस-भुजबळांकडून एकमेकांचे कौतुक.
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?
'दम असेल तर या तुमचे कपडे फाडून...', रत्नाकर गुट्टेंचं कोणाला चॅलेंज?.
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?
'लाडक्या बहिणी आता नावडत्या होणार', राज ठाकरेंचं ट्वीट नेमकं काय?.
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य
'...त्यावेळी महाराष्ट्रात राज ठाकरेंची किंमत कळेल', मनसे नेत्याच भाष्य.
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण
भुजबळ-फडणवीसांचा एकाच गाडीने प्रवास अन् चर्चांना उधाण.