Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरु केले’, मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले, मुंडे या हत्येच्या प्रकरणातील आरोपींना मदत करत असल्याचा आरोप जरांगेंनी केला.

'धनंजय मुंडे यांनी षडयंत्र सुरु केले', मनोज जरांगे यांचे गंभीर आरोप
Follow us
| Updated on: Jan 09, 2025 | 4:37 PM

बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करुन त्या प्रकरणाचा सखोल छडा लावावा, या मागणीसाठी पैठण येथे मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवी देशमुख सहभागी झाले. या मोर्चात मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी भूमिका मांडली. यावेळी त्यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचं नाव घेत त्यांच्यावर प्रचंड घणाघात केला. त्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केले. “या धनंजय मुंडेने जे प्रयोग सुरु केले आहेत, या धनंजय मुंडेने जे षडयंत्र सुरु केले आहेत, तो जे लोकांना आता सांगतोय की, मोर्चे काढा, आंदोलने करा. हे सर्व धनंजय मुंडे यांचं काम आहे. दुसरं कोणाचं नाही”, असा घणाघात मनोज जरांगे पाटील यांनी केला.

“धनंजय मुंडे तुमच्या लक्षात येत नाहीय, तुम्ही जास्त खोलात जात आहात. तुम्ही अशी फूट जर पाडली, संतोष भैय्याच्या पाठिशी उभं न राहता आरोपींच्या पाठिशी उभं राहण्याचं काम तुमच्या लाभार्थी टोळीकडून सुरु केलं, यानंतर तुमच्या घरातलं कुणी मेलं तर असेच मोर्चे काढायचे का? हा महाराष्ट्र धनंजय मुंडे नेमकं कोणत्या बाजूला घेऊन चालला आहे? आपण मंत्री पदावर आहात. संविधानाची शपथ घेतली आहे. राज्याचा प्रमुख व्यक्ती म्हणून आपण काम करत आहात. तुमच्या लाभार्थ्या गुंड टोळीला तुम्ही राज्यात आंदोलने करायला लावता आणि आरोपींना साथ द्यायला लावता ही धनंजय मुंडेंची झालेली दिशा चांगली नाही”, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

‘धनंजय मुंडे हा या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती…’

“जर राज्यात काही घडलं, कोणताही माणूस मेला किंवा मारला, तर आरोपीला साथ द्यायची तर सर्वात आधी जाती-धर्माची लोकं समोर येतील. या राज्यातलं आणि देशातलं पहिलं उदाहरण आहे की, धनंजय मुंडे हा या गोष्टी त्या गुंड टोळीच्या जीवावरती घडवून आणायला लागलाय. मी त्यादिवशी परभणीला काय बोललो? धनंजय देशमुखांना त्या धनंजय मुंडेंच्या लोकांनी धमकी दिली. या राज्यातील लोकं म्हणत आहेत की, संतोष देशमुखांच्या वेळेस त्याचवेळी अॅट्रॉसिटी दाखल झाला असता तर संतोष देशमुख यांचा खून झाला नसता”, अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

‘जीवात जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठिशी’

“संतोष भैय्याच्या लेकीने आपल्याला हाक दिली, त्या लेकीची शेवटची इच्छा आहे की, माझ्या वडिलांना न्याय मिळायला हवा. न्याय मिळवून देण्यासाठी एकाही बांधवाने मागे हटायचं नाही. आता त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची भेट झाली. मुख्यमंत्र्यांनी वचन दिलं की, एकाही आरोपीला सोडणार नाही. जेवढी साखळी आहे ती सगळी साखळी पकडली जाईल या शब्दाला मुख्यमंत्र्यांनी खरं करावं. यातला आणि सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येमधील एकही आरोपी सुटला तर सरकारची गाठ आमच्यासोबत आहे. धनंजय भैय्या, जीवात जीव असेपर्यंत हा समाज तुमच्या पाठिशी राहील. संतोष भैय्याला न्याय मिळेपर्यंत एकही माणूस मागे हटणार नाही”, असं मनोज जरांगे म्हणाले.

अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले
त्यांनी जेवायला बोलवलंय, अजितदादांची भेट घेणार... सुरेश धस काय म्हणाले.
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला
'वडिलांचं कर्तृत्व नसेल तर पराभव...', सरवणकरांचा अमित ठाकरेंना टोला.
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा
बीडच्या सगळ्या गँगला आता सुतासारखं सरळ करणार; अजितदादांचा इशारा.
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?
दादांनी महिला कार्यकर्त्याला झापलं, दादा बीडमध्ये बघा काय-काय घडलं?.
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू
वक्फ बोर्डाला धर्मनिरपेक्ष बनवायचे आहे - संसदीय मंत्री किरेन रिजिजू.
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल
गंगाजल शुद्धच पण.., शिवसेनेकडून सेनाभवनासमोर बॅनरबाजी अन् मनसेला डिवचल.