AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Manoj Jarange : मराठ्यांनी मनावर घेतले तर राज्यात…विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी ललकारले

Maratha Reservation : राज्यात मराठा आरक्षणानंतर ओबीसी आरक्षणाने पण लक्ष वेधले. मराठा आंदोलनावर ओबीसीचे काही नेते जातीवाद होत असल्याचा आरोप करत आहे. त्याला मनोज जरांगे पाटील यांनी खणखणीत उत्तर दिले आहे. त्यांनी राज्य सरकारला मोठा इशारा पण दिला आहे.

Manoj Jarange : मराठ्यांनी मनावर घेतले तर राज्यात...विधानसभा निवडणुकीपूर्वीच मनोज जरांगे पाटलांनी ललकारले
जरांगे पाटील यांचा इशारा
Follow us
| Updated on: Jun 30, 2024 | 3:42 PM

ओबीसी आंदोलनानंतर राज्यात अनेक भागात, बीडमध्ये ओबीसी विरुद्ध मराठा अशा वादाला फोडणी घालण्याचे काम करण्यात येत आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी याप्रकरणी रोखठोक भूमिका जाहीर केली आहे. हे आंदोलन कुणाच्या इशाऱ्यावरुन करण्यात येत आहे, हे त्यांनी स्पष्ट केले. तर सरकारला विधानसभेपूर्वची एक मोठा इशारा दिला आहे. त्यामुळे आता 13 जुलैनंतर राज्यात काय होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मेटे यांना मराठा समाज विसरणार नाही

गोरगरीब लोकांना आरक्षण मिळाले पाहिजे असं विनायक मेटे यांचं स्वप्न होतं. मेटे यांचं बलिदान मराठा आरक्षणासाठी गेला आहे. मराठा समाज त्यांना कधीही विसरणार नाही. त्यांचे स्वप्न.पूर्ण करण्याची जबाबदारी समाजाच्या खांद्यावर आहे. कोणीही मागे हटायचे नाही. 100 टक्के मराठा मोठा करायचं आहे, म्हणून ही लढाई आहे. मेटे यांची जयंती आहे, मी खोटे बोलणार नाही. जातीवाद केला नाही. आणि कधी करणार देखील नाही, असे जरांगे पाटील म्हणाले.

हे सुद्धा वाचा

छगन भुजबळांवर ओढला आसूड

जातीयवाद कोण करते हे सर्वाना माहिती आहे. येवलावाल्याने सगळा माल जमवला आहे, असा आसूड त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर ओढला. 18 व्या शतकात मराठवाड्यात आरक्षण होते. मात्र आम्हाला स्वातंत्र्यानंतर आरक्षण दिले. ओबीसी का समजून घेत नाही. तुमच्या आधी आम्हाला आरक्षण मिळाले आहे. – 57लाख आमच्या नोंदी रद्द करा म्हणताय. मग जातीवाद कोण करते आहे. आम्ही आंदोलन उभ केलं, की आमच्यापुढे तुम्ही बसविता. आम्ही मुक मोर्चे काढले आणि तुम्ही प्रतीमोर्चे काढले.

आम्हाला ही वाटते आमचं विकास झाला पाहिजे. आमच्याही लेकरांचे स्वप्न आहेत जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके जमा करत आहेत. आमची धमकी नाही, हे आमचं हक्क आहे. तुम्ही तुमच्यात परिवर्तन करा. आम्ही एक आलो की जातीयवाद, तुम्ही एक आलात की संविधानीक .. हे असे कसे? येवलावाल्याने सगळा माल जमा केला. मेटे यांनी जातीवाद केला नाही.आमच्या आया बहिणीवर हल्ला झाला. लेकराचे हाल बघून जागचे हलले नाहीत. आम्ही एक झालो तर तुमच्या पोटात दुखते. आमचे आंदोलन सुरू असताना अंबड येथे सभा का घेतली. कोण करतेय जातीवाद, असा सवाल त्यांनी केला.

मनोज जरांगे यांचा इशारा

मराठ्यांनी मनावर घेतले तर निवडणूक काळात राज्यात काहीही होवू शकते. राज्यात मराठे 55 टक्केच्या वर आहेत. आमची जात काढू नका. तुम्ही मनगट दाखविण्याची भाषा करू नका. मराठ्याच्या हे जन्मापासून रक्तात आहे. ओबीसी बांधवांनो शांतता बाळगा. तुमचे नेते तुमच्यासोबत खोटे बोलत आहेत. तुमच्या आधी मराठ्यांना आरक्षण आहे. 13 तारखेला निर्णय घ्या. अन्यथा 288 मधील एकही निवडून आणू देणार नाही. मी धोका कधी करत नाही. मी खोटं बोलत नाही. आरक्षण दिले नाहीत तर पडायचे की निवडून आणायचे हे मी सांगेन. मी नाव घेऊन पाडा असे सांगेल, असा इशारा जरांगे यांनी दिला.

भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन
भारत- पाकिस्तान दोघांनी शांतता राखावी; यूएनएससीचं आवाहन.
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष
भारतात उद्या युद्धाचा सायरन वाजणार, आशियाई देशाचं मॉक ड्रिलकडे लक्ष.
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल
आमच्या हाती काय बंदुका देणार? मॉक ड्रिलवरून राऊतांचा सरकारला खोचक सवाल.
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं...
देशव्यापी मॉक ड्रिल, आपत्कालीन परिस्थितीत कराल? तज्ज्ञांनी सांगितलं....
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण...
भारतासोबत युद्ध झालं तर अवघ्या 100 तासांत पाकिस्तानचे 5 तुकडे, कारण....
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्...
चोरीला गेलेलं बाळ सुखरूप आईच्या कुशीत, पोलिसांकडून 48 तासात शोध अन्....
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...
युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी....
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय
पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय.
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी
मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी.
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले....