मराठा आंदोलक आक्रमक, माजलगाव नगरपरिषद फोडली, प्रचंड राडा

बीडमध्ये मराठा आंदोलनाला हिंसक वळण लागताना दिसत आहे. बीडमध्ये अनेक मोठ्या नेत्यांच्या घर तसेच कार्यालयांच्या परिसरात मराठा आंदोलकांनी जाळपोळ केलीय. तर काही मराठा आंदोलकांनी माजलगाव नगरपरीषदेवर दडगफेक आणि जाळपोळ केल्याची माहिती समोर आलीय.

मराठा आंदोलक आक्रमक, माजलगाव नगरपरिषद फोडली, प्रचंड राडा
Follow us
| Updated on: Oct 30, 2023 | 9:42 PM

बीड | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील वातावरण प्रचंड तापताना दिसत आहे. विशेष म्हणजे बीडमध्ये मराठा कार्यकर्त्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याला जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश सोळंके यांच्या माजलगाव येथील बंगला परिसरात मराठा कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. त्यानंतर बंगल्याच्या दिशेला दगडफेक करण्यात आली. आंदोलकांनी बंगला परिसरातील गाडीला आग लावली. नंतर थेट बंगल्यालाच आग लावली. संबंधित घटनेचा व्हिडीओदेखील समोर आलाय. विशेष म्हणजे मराठा कार्यकर्त्यांनी आज माजलगाव नगर परिषदेच्या कार्यालयातही जाळपोळ केली.

मराठा समाजाच्या तरुणांचा आज अचानक माजलगाव नगर परिषदेवर मोर्चा वळला. तरुणांनी हातात दगड घेत थेट नगरपरिषदेवर दगडफेक केली. त्यानंतर संतप्त जमावाने नगरपरिषदेला आग लावली. त्यामुळे नगरपरिषदेचं मोठा नुकसान झालंय. माजलगावमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे. पण या आंदोलनामुळे माजलगाव नगरपरिषदेच्या ऑफिसमध्ये फर्निचर, खुर्ची, टेबल, कॉम्प्युटर जळून खाक झालंय. तसेच मुख्याधिकाऱ्यांचं संपूर्ण ऑफिस जळून खाक झालंय.

क्षीरसागर काका-पुतण्यांचे कार्यालय आणि घर जाळलं

मराठा कार्यकर्त्यांनी आज बीडमध्ये प्रचंड राडा केला. मराठा कार्यकर्त्यांनी माजलगाव नगर परिषदेत जाळपोळ केली. तसेच आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्याची जाळपोळ केली. आंदोलक इथेच थांबले नाहीत. त्यांनी माजी आमदार जयदत्त क्षीरसागर यांच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्या बंगल्याला देखील जाळपोळ केल्याची माहिती समोर आली आहे.

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.