“अजितदादा हे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं पुन्हा तिच री ओढली…

अजित पवार यांच्या नेतृत्वागुणामुळेच दिल्लीतून सूत्र हलले असून अजित पवार हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अजितदादा हे मुख्यमंत्री होणार, वेट अँड वॉच; राष्ट्रवादीच्या नेत्यानं पुन्हा तिच री ओढली...
Follow us
| Updated on: Apr 26, 2023 | 8:32 PM

बीड : मागील काही दिवसांपासून अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून वेगवेगळ्या शहरातून फलक झळकत आहेत. त्यामुळे राज्यातील राजकारण प्रचंड तापले आहे. भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले असले तरी त्यावर अजित पवार यांनी प्रतिक्रिया देताना त्यांनी हे सगळे प्रकरण कार्यकर्त्यांवर ढकलून दिले आहे. आताही त्यावरूनच राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही विश्वासाने आता अजित पवारच हे भावी मुख्यमंत्री असणार आहेत असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यालाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिठकरी यांनी त्याचे जोरदार समर्थन करत त्यांनीही अजित पवार हेच भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे त्यांनीही सांगितले आहे.

त्यामुळे आता पुन्हा एकदा भावी मुख्यमंत्र्यांविषयी जोरदार चर्चा सुरू झाल्या आहेत. ज्या प्रमाणे कार्यकर्त्यांनी पोस्टर लावून त्यांना समर्थन दिले आहे. त्याच प्रमाणे अमोल मिटकरी यांनीही अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा विश्वास  व्यक्त केला आहे.

आमदार अमोल मिटकरी यांनी भविष्यातील राजकारणाविषयी बोलताना विरोधी पक्षनेते अजित पवार हेच राज्यातील भावी मुख्यमंत्री होणार असल्याचे सांगत त्यांनी विरोधकांवरही त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. यावेळी त्यांनी राणा दांपत्यावर सडकून टीका केली आहे.

राणा दाम्पत्य हे सतत चर्चेत राहणारे दाम्पत्य आहे. त्यामुळे वेगवेगळ्या गोष्टींचे श्रेय घेण्याचा हा त्यांचा केविलवाणा प्रयत्न असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

राणा दांपत्य हे आगामी काळातील निवडणुकीत म्हणजेच 2024 ला दोघेही निवडून येणार नाहीत असा टोलाही त्यांनी राणा दांपत्यांवर केला आहे.

नवनीत राणा याना हनुमानाचा जन्म कुठे झाले हे माहित नाही, मात्र पठाण चित्रपटात मुस्लिम अभिनेता असल्याने भगव्या रंगाला विरोध केला होता.

तर नवनीत राणा यांनी काही चित्रपटातून स्वतः भगव्या रंगाचा दुरुपयोग केला असल्याची टीकाही त्यांनी त्यांच्यावर केलीआहे. राणा दाम्पत्य हे चमकोगिरी करणारं दाम्पत्य असल्याची खोचक टीकाही त्यानी त्यांच्यावर केली आहे.

तर अजित पवार यांच्याविषयी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षनेते अजित पवार हेच मुख्यमंत्री व्हावे अशी कार्यकर्त्यांची आणि सर्वांची भावना आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी त्यांचे बॅनर लागले आहेत. अजित पवार यांच्यासारखा तोलामोलाचा नेता आणि महाराष्ट्राचे राजकारण सांभाळेल असा सध्या तरी महाराष्ट्रात कोणी नेता नाही.

त्यांच्या याच स्वभावामुळे दस्तुरखुद्द अमित शहा यांनी कबूल केले आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. अजितदादा हे मुख्यमंत्री होणार आहेत त्यामुळे वेट अँड वॉच अशी प्रतिक्रियाही अमोल मिटकरी यांनी व्यक्त केली आहे.

अजित पवार यांच्या नेतृत्वागुणामुळेच दिल्लीतून सूत्र हलले असून अजित पवार हेच महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री दिसतील असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.