AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : परळीत ‘घड्याळा’चा गजर? शरद पवार यांचं टायमिंग चुकणार? काय सांगतो कल

Parli Constituency Result 2024 : बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना टपाली मतांचा कौल नव्हता. पण ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. ते 9000 मतांनी आघाडीवर आहेत.

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : परळीत 'घड्याळा'चा गजर? शरद पवार यांचं टायमिंग चुकणार? काय सांगतो कल
पंकजा मुंडे, धनंजय मुंडेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 9:37 AM

मराठवाड्यातील सर्वात हायप्रोफाईल लढत असलेल्या परळी मतदारसंघात धनंजय मुंडे मुसंडी मारतील का? यावरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. धनंजय मुंडे यांच्याविरोधात स्वतः शरद पवार यांनी रणनीती आखली होती. बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कारण यंदा पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक ही कमळ चिन्हावर नाही तर घड्याळावर लढवल्या जात आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना टपाली मतांचा कौल नव्हता. पण ईव्हीएम मतांमध्ये त्यांनी मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे या मतदारसंघात अजित पवार गटाच्या घड्याळाचा गजर होणार का? की शरद पवार यांच्या डावपेचांना यश येईल हे लवकरच समोर येईल.

लोकसभेला मोठा फटका

मराठावाड्यातील 8 मतदारसंघात केवळ छत्रपती संभाजीनगर येथील एक जागा जिंकण्यात महायुतीला यश आले होते. तर सात जागा त्यांच्या हातून निसटल्या होत्या. बीड जिल्ह्यात तर हायहोल्टेज ड्रामा पाहायला मिळाला होता. रात्री उशीरा झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे बजरंग सोनवणे यांनी तुतारी फुंकली होती. त्यांना 6500 मते मिळाली होती. या जिल्ह्यात सध्या विधानसभेचे 6 मतदारसंघ येतात. त्यात परळी आणि माजलगाव येथील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सध्याचे कल पाहता, धनंजय मुंडे यांनी आघाडी घेतली आहे. पहिल्यांदाच परळी विधानसभा मतदारसंघात घड्याळाचा प्रयोग होत आहे. आतापर्यंत या मतदारसंघात कमळ फुलेले होते. यंदा घड्याळाचा गजर होणार की, शरद पवार पॉवर दाखवणार हे समोर येईल.

हे सुद्धा वाचा

धनंजय मुंडे यांना महायुतीकडून उमेदवारी

महायुतीत ही परळी विधानसभेची जागा ही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसाठी सोडण्यात आली. यापूर्वी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. पण अजितदादा गट हा महायुतीत गेल्यानंतर ही जागा घड्याळासाठी सोडण्यात आली. दोन्ही बहिण-भावात दिलजमाई झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या विजयासाठी मोठी कामगिरी बजावली होती. परळी मतदारसंघातून पंकजा मुंडे यांना 74 हजार 834 मतांची लीड मिळाली होती. आता धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात थेट लढत होत आहे. त्यात कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल. सध्या त्यांना 9000 मतांची आघाडी मिळाली आहे.

पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन
पाकिस्तान बॅकफूटवर, 5 वाजेपासून युद्धविराम, दोन्ही देशांकडून सहमती अन.
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत....
भारत-पाक तणावादरम्यान मुंबईकरांसाठी मोठी बातमी, आता 9 जूनपर्यंत.....
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल
मोदी सरकारचा दहशतवादाविरुद्ध मोठा निर्णय, यापुढे तसं कृत्य युद्ध ठरेल.
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच...
भारतीय लष्कराकडून सैन्याच्या शौर्याचा व्हिडीओ शेअर, एकदा बघाच....
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त
VIDEO: पाकच्या रहिम यार खान एअरबेसचा चक्काचूर अन् धावपट्टीही उद्ध्वस्त.
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?
चिनाब नदीवरील सलाल धरणातून पाणी सोडलं, पाकिस्तानात पूर येणार?.
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा
पाकिस्तानचा कांगावा, 'तो' दावा खोटा, भारतीय लष्कराने दिला पुरावा.
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर
ऑपरेशन 'सिंदूर'मध्ये टॉप 5 कमांडरचा खात्मा, पाकिस्तानातून थेट नाव समोर.
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस
VIDEO पाकला मोठा हादरा, भारतानं असं उडवलं रावळपिंडीतलं नूर खान एअरबेस.
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?
भारताचा मोठा स्ट्राईक, पाकचे 5 एअरबेस उडवले; पाकसाठी किती महत्त्वाचे?.