‘आम्ही समाधानी म्हणणे घाईचे’, धनंजय देशमुख यांची ती मोठी मागणी, चार महिन्यानंतर आरोपींकडून संतोष देशमुख यांच्या खूनाची कबुली
Dhananjay Deshmukh First Reaction : सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणात आता धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी काय केली मागणी?

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या करण्यात आली होती. या हत्येचे व्हिडिओ शुटिंग या हैवान आरोपींनी केले. त्यांना हालहाल करून मारण्यात आले. त्यांच्या या खून प्रकरणाने आरोपींची सडकी मानसिकता समोर आली. तर दुसरीकडे अवघ्या महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली. चार महिन्यानंतर बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल याप्रकरणाची सुनावणी झाली. सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. याप्रकरणात आता धनंजय देशमुख यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी मोठी मागणी केली आहे.
काय दिली कबुली
या क्रूर हत्येप्रकरणात सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी चार महिन्यानंतर कबुली दिली. या तिघांच्या कबुलीजबाबामुळे वाल्मिक कराड गोत्यात आला आहे. या खून प्रकरणात कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. या प्रकरणातील 8 आरोपींना मकोका लावण्यात आला आहे. त्यांच्याविरोधातील इलेक्ट्रॉनिक सज्जड पुरावे पण यंत्रणांकडे आहेत. पण यातील आरोपी वाल्मिक कराड याला देण्यात येत असलेली व्हिआयपी ट्रीटमेंट राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे.




आम्ही समाधानी म्हणणे घाईचे
दरम्यान याप्रकरणात संतोष देशमुख यांचे बंधु धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आरोपींनी चार महिन्यानंतर खूनाची कबुली दिली आहे. न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागल्याचे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. तर आरोपींनी कबुली दिल्यावर आम्ही समाधानी आहोत, असे म्हणणे घाईचे होईल. जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही. तोपर्यंत समाधानी म्हणणे घाईचे होईल असे धनंजय देशमुख म्हणाले. तर त्यांनी आरोपी कृष्णा आंधळे याला अटक करण्याची मागणी केली. तसेच सर्व आरोपींना फाशी देण्याची मागणी केली आहे. गेल्या चार महिन्यापासून कृष्णा आंधळे हा फरार आहे. तो नाशिक शहरात दिसल्याचा यापूर्वी अनेकदा दावा करण्यात आला आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपींना अटकेसाठी मोठा संघर्ष आणि आंदोलनं करावे लागले होते.