Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र? सूत्रांकडून महत्त्वाची माहिती

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ साखर कारखान्याने तब्बल 19 कोटींचा जीएसटी कर थकवल्याची माहिती समोर आलीय. संबंधित प्रकार समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी महत्त्वाची अपडेट समोर आलीय.

Pankaja Munde | पंकजा मुंडे यांना बदनाम करण्याचे षडयंत्र? सूत्रांकडून महत्त्वाची माहिती
Follow us
| Updated on: Sep 25, 2023 | 10:56 PM

महेंद्रकुमार मुधोळकर, Tv9 मराठी, बीड | 25 सप्टेंबर 2023 : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना प्रकरणी एक महत्त्वाची माहिती समोर आलीय. या कारखान्याच्या प्रशासनाने तब्बल 19 कोटी रुपयांचा जीएसटी कर थकवला, अशी माहिती समोर आलीय. जीएसटी विभागाने याबाबत कारखान्याला नोटीसही बजावली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याच प्रकरणी अधिकृत सूत्रांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा कोट्यवधीचा जीएसटी कर थकला असला तरी या कारखान्यावर जप्तीची कारवाई होणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याने यूनियन बँकेकडून 1200 कोटींचं कर्ज घेतलं होतं. इतक्या मोठ्या रकमेच्या कर्जाची परतफेड न केल्याने यूनियन बँकेने वैद्यनाथ कारखान्यावर जप्तीची कारवाई केलीय. आता या कारखान्यावर बँकेचा ताबा आहे. असं असताना आता जीएसटी विभागाची नोटीस आल्याने खळबळ उडाली आहे.

बदनामी करण्याचे षडयंत्र?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वैद्यनाथ साखर कारखान्याला केवळ GST विभागाची नोटीसव देण्यात आलीय. 19 कोटी कर थकविल्याचा GST विभागाचा दावा आहे. पण प्रत्यक्षात एवढी रक्कम नसल्याची माहिती कारखाना प्रशासनातील सूत्रांनी दिली आहे. कारखाना सध्या संपूर्णपणे बंद अवस्थेत आहे. जप्ती म्हणून बदनामी करण्याचे षडयंत्र असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त

संबंधित प्रकरणावर पंकजा मुंडे यांनीदेखील प्रतिक्रिया दिलीय. त्यांनी या प्रकरणावरुन केंद्र सरकारवर जाहीर नाराजी व्यक्त केलीय. केंद्र सरकारकडे सात-आठ साखर कारखान्यांना मदतीची प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यामध्ये आपल्याही साखर कारखान्याचं नाव होतं. पण आपला साखर कारखाना वगळता इतर सर्वांना सरकारने मदत केली. सरकारने आपल्यालाही मदत केली असती तर ही परिस्थिती आली नसती, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केलीय.

‘मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहीन’

दरम्यान, या प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिलीय. पंकजा मुंडे भारतीय जनता पार्टीची लेक नाही का? मुंडे साहेबांच्या लेकीवर अन्याय करण्याचा पाप भाजपा करतेय. राज्यातील आणि देशातील कुठल्याही लेकीवर अन्याय होत असेल तर मी तिच्या बाजूने खंबीरपणे उभी राहीन, अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी मांडलीय.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.