बीडमध्ये परिवहन महामंडळाच्या सचिवाच्या फोटोला गोमूत्राचा अभिषेक, शासनात विलीनीकरणासाठीचा लढा तीव्र
बीडः एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र परिवहन महामंडळाचे सचिव आशिषकुमार सिंह (Ashish Kumar Singh) हे सुटी काढून विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे बीडमधील एसटी (Beed St Strike) कर्मचाऱ्यांनी […]
बीडः एसटी महामंडळाचे (ST Strike) शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी सध्या एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यव्यापी आंदोलन सुरु आहे. मागील पंधरा दिवसांपासून एसटी कर्मचारी जीवाची पर्वा न करता या आंदोलनात सहभागी झाले आहेत. मात्र परिवहन महामंडळाचे सचिव आशिषकुमार सिंह (Ashish Kumar Singh) हे सुटी काढून विदेश दौऱ्यावर गेले आहेत. यामुळे बीडमधील एसटी (Beed St Strike) कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. आंदोलनकर्त्यांनी त्यांच्या फोटोला गोमूत्राचा अभिषेक केला.
महामंडळाच्या सचिवांना प्रतिकात्मक गोमूत्राचा अभिषेक
बीडमधील माजलगाव येथील एसटी कर्मचाऱ्यांनी परिवहन महामंडळाच्या सचिवांवर आज संताप व्यक्त केला. महामंडळाचे सचिव आशिषकुमार सिंह हे सध्या विदेश दौऱ्यावर असून त्यांना राज्यातील संपकऱ्यांची काडीमात्र चिंता नाही. असा आरोप करत एसटी कर्मचाऱ्यांनी त्यांचा निषेध केला. सचिवांच्या फोटोला गोमूत्राचा अभिषेक करत आंदोलनकर्त्यांनी यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजीदेखील केली.
अंबाजोगाई एसटी कर्मचाऱ्यांचं अर्धनग्र आंदोलन
दुसरीकडे अंबाजोगाई येथील कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन केलं. एसटी कर्चमाऱ्यांच्या आंदोलनाचा हा तेरावा दिवस आहे. राज्य शासनात विलीनीकरण करण्यात यावं, तसेच कोरोना काळात मृत पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना विनाअट पन्नास लाखांची मदत देण्यात यावी, या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
इतर बातम्या-