माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. या दगडफेकीत ठोंबरे आणि त्यांच्या वाहनाचा चालक जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या गाडीवर दगडफेक, ड्रायव्हरसह ठोंबरे जखमी, रुग्णालयात उपचार सुरु
Follow us
| Updated on: Aug 28, 2024 | 9:23 PM

भाजपच्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांच्या वाहनावर अज्ञातांकडून दगडफेक झाल्याची माहिती समोर येत आहे. संगीता ठोंबरे यांच्यासह त्यांच्या गाडीचे ड्रायव्हर या हल्ल्यात जखमी झाले आहेत. दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. संगीता ठोंबरे या केजमधील दहिफळ वड माऊली येथील कार्यक्रमात गेल्या होत्या. यावेळी त्यांच्या कारवर अचानक अज्ञातांकडून संगीता ठोंबरे यांच्या कारवर दगडफेक करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरु आहे.

केज विधानसभेच्या माजी आमदार संगीता ठोंबरे या केज तालुक्यातील दहिफळ वड माऊली येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दहिफळ वडगाव येथ गेल्या होत्या. संगीता ठोंबरे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करून सायंकाळी जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली.

या दगडफेकीत गाडीचा ड्रायव्हरच्या बाजूचा काच फुटून तो दगड गाडीचा चालक किशोर बबन मोरे यांना लागला. त्यानंतर तोच दगड गाडीमध्ये बसलेल्या माजी आमदार संगीता ठोंबरे यांना लागला. त्यामुळे त्याही जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर केज येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान याप्रकरणी पोलिसात तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.