बीडचा आका ते एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्जांचे व्यवहार, सुरेश धस यांची Tv9 ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया

"पोलीस त्यांना सापडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, याच्यात कुणालाही सोडणार नाही. माझं आता ठाम मत झालं आहे, ते तीन लोकांना का येऊ देत नाहीत? आका का हजर होत नाहीत? आका कलम 302 च्या गुन्ह्यात शंभर टक्के आहेत", असं मोठं वक्तव्य सुरेश धस यांनी 'टीव्ही 9 मराठी'सोबत बोलताना केलं.

बीडचा आका ते एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्जांचे व्यवहार, सुरेश धस यांची Tv9 ला एक्सक्लुझिव्ह प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Dec 27, 2024 | 4:02 PM

भाजप आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या नव्या एसपींची भेट घेतली. बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन त्यांनी एसपींची भेट घेतली. या प्रकरणातील नवी माहिती सुरेश धस यांनी एसपींना दिली. एसपींची भेट घेतल्यानंतर सुरेश धस यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी अनेक धक्कादायक गौप्यस्फोट केले. त्यांनी महादेव बेटिंग अ‍ॅप घोटाळ्याचा उल्लेख करत एकाच व्यक्तीच्या नावावर 9 अब्जांचा व्यवहार झाल्याचा आरोप केला. तसेच या घोटाळ्याचे धागेदोरे हे मलेशियापर्यंत असल्याचा दावा सुरेश धस यांनी केला. यावेळी त्यांनी बीडमधील सर्व घटनांमागे आका असल्याचा आरोप केला. त्यांनी सर्व माध्यमांना प्रतिक्रिया दिल्यानंतर ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बातचित केली. यावेळी त्यांनी आपण एसपींना आका कुठे कुठे फिरत आहे, याची माहिती दिल्याचं धस म्हणाले.

एसपींच्या भेटीत काय चर्चा झाली?

“आम्ही नवीन एसपींना एकच विनंती करायला आलो की, लवकरात लवकर छडा लागला पाहिजे. सीआयडीचे आयजी यांच्याकडे तपास आहे. सपोर्टिंग करण्याचं काम पोलीस दल करत आहे. माझं स्वत:चं समाधान आहे. बीडचं पूर्ण पोलीस दल हे एकटे आकाच्या वर पडले आहेत. लवकरच आका हाती येतील, अशी आशा बाळगतोय. मी एसपींना माहिती दिली आहे. जे आका सध्या फिरत आहेत ते कुठे कुठे फिरत आहेत, याची माहिती आम्ही दिली”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.

पोलिसांना आका का मिळत नाही?

“पोलीस त्यांना सापडवतील. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं आहे, याच्यात कुणालाही सोडणार नाही. माझं आता ठाम मत झालं आहे, ते तीन लोकांना का येऊ देत नाहीत? आका का हजर होत नाहीत? आका कलम 302 च्या गुन्ह्यात शंभर टक्के आहेत”, असं सुरेश धस म्हणाले. यावेळी सुरेश धस यांना या प्रकरणात फक्त खंडणीचा गुन्हा का केला? असा प्रश्न विचारण्यात आला त्यावर त्यांनी “अहो, गुन्हा दाखल होईल ना! तपासातून त्या बाबी पुढे येतील. नंतर गुन्हा दाखल होईल”, असं सुरेश धस म्हणाले.

एसपींना काय-काय सांगितलं?

“एसपींना सर्व सांगितलं. कसे कसे चांगले अधिकारी बाजूला काढले, भ्रष्टाचारी अधिकारी ठेवले. गात नावाचा एक पीआय आहे, त्याने जाणीवपूर्वक हे सर्व केलेलं आहे. पैसे खाऊन एका व्यक्तीच्या नावावर 9 अब्ज रुपयांचे ट्रान्झेक्शन होतं. अशा प्रकारचा तपास आणि इतक्या डेंजर आरोपीच्या प्रकरणात जामीन होतात. काहींना अटक केली होती. या प्रकरणात मोक्का गुन्हा दाखल व्हायला पाहिजे. बीड जिल्ह्यात ज्ञानराधा, परळीची राजस्थानी मल्टिस्टेट, जिजावू माँसाहेब, माजलगावची एक बँक आहे, सर्व मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह बँकांनी जवळपास 10 हजार कोटी रुपये, शेतकऱ्यांची सहा ते साडेसहा हजार कोटी रुपये बुडवले. ही घटना नाहीय. त्यांच्या डिफेन्डर नावाची गाडी गिफ्ट दिली की तुमची संस्था खूप चांगली आहे. हे सगळं चालल्यामुळे आणि काही ठिकाणी एसीबीची रेड पडली. तिथे एक-एक कोटी रुपये मिळाली. त्यांचा बचाव कोणी केला, याचासुद्धा तपास झाला पाहिजे”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली.

कुणाच्या नावावर 9 अब्जांचा व्यवहार झाला?

यावेळी धस यांना कुणाच्या नावावर 9 अब्जांचा व्यवहार झाला? असा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा “ते सगळं ते गात अधिकाऱ्याला माहिती आहे. वाटल्यास त्या गात नावाच्या पीआयला विचारुन घ्या. त्याने नाही सांगितलं तर मी उद्या सगळं सांगतो. माझ्याकडे फाईल आहे. मी घरी विसरुन आलो”, अशी प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.