‘मी अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाच नाही’, सुरेश धस यांचं वक्तव्य

"मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली. लगेच मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांना फोन केला आणि याला तुमची संमती आहे का विचारलं", असं सुरेश धस यांनी सांगितलं.

'मी अजून धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलाच नाही', सुरेश धस यांचं वक्तव्य
Follow us
| Updated on: Jan 02, 2025 | 4:37 PM

बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी वाल्मिक कराड जवळपास 22 दिवसांपासून फरार होता. अखेर त्याची बँक खाती गोठवल्यानंतर तो सीआयडीला शरण आला. या प्रकरणावरुन वाल्मिक कराडवर निशाणा साधत असताना विरोधकांकडून अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला जात होता. माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी तर थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं होतं. तर भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडून आका आणि आकाचा आका अशा शब्दांत निशाणा साधला जात होता. दरम्यानच्या काळात अनेकांनी धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकण्याची मागणी केली. यानंतर आता सुरेश धस यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. “मी अजून धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला नाही”, असं सुरेश धस म्हणाले आहेत. मग सुरेश धस नेमकं कुणावर निशाणा साधत होते? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय. त्यांनी कुणावर टीका करताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचं नाव घेतलं होतं? असाही प्रश्न आता उपस्थित होतोय.

सुरेश धस यांना यावेळी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारला असता, “ते माझ्यापेक्षा मोठे. पण मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. ते काय बोलले यावर मी बोलणार नाही”, असं धस म्हणाले. “हे आता मोठ्या आकांबरोबर सगळीकडे होते. त्यामुळे ते अजित पवारांसोबत होते”, असं वक्तव्य सुरेश धस यांनी गाडीबाबत विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना केलं.

‘बीडमध्ये हे प्रकरण नको’

“बीडमध्ये चालवावं. पण त्यांना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये. यांना बीडच्या लॉकअपमध्ये ठेवू नये. एकतर नाशिकला नेण्यात यावं. नाहीतर संभाजीनगरला ठेऊरमध्ये नेण्यात यावं. मी आता तर त्यांना हलवायला सांगत आहे. मात्र काही वेळाने तर केस दुसऱ्या जिल्ह्यात देण्यात यावी”, अशी मागणी सुरेश धस यांनी केली. “खंडणी मागणाऱ्या गुन्हेगारासोबत राज्याचे मंत्री सोबत असतील तर त्या पदावर राहण्याची त्यांची अॅबिलिटी नाही”, असंही सुरेश धस म्हणाले.

हे सुद्धा वाचा

उज्ज्वल निकम केस लढणार?

“मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मी भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी अशी विनंती केली. लगेच मुख्यमंत्र्यांनी उज्ज्वल निकम यांना फोन केला आणि याला तुमची संमती आहे का विचारलं? यावर उज्ज्वल निकम संध्याकाळी मुख्यमंत्र्यांशी बोलणार आहेत. त्यामुळे आज रात्री किंवा उद्या दुपारपर्यंत समजेल”, असं सुरेश धस यांनी सांगितलं. “जे पथक नेमलं आहे त्यातील चार-दोन कर्मचाऱ्यांचा बाबतीत त्यांच्या कुटुंबाच्या आणि बीड जिल्ह्यातील काही अधिकारी आहेत, खरंतर ते प्रमुख नाहीत, पण समितीत नेमले आहेत त्यांच्या बाबतीत ऑबजेक्शन आहे. त्यांनी मला ज्यांच्याबाबत ऑबजेक्शन आहे ते सांगितलं आहे”, असंही सुरेश धस यांनी सांगितलं.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?
'लाडक्या बहिणी'ने पैसे स्वतःहून केले परत, धुळ्यात नेमकं काय घडलं?.
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग...
मंत्री धनंजय मुंडेंवर मनोज जरांगे अन् सुरेश धसांची शाब्दिक फायरिंग....
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार
निवडणुका झाल्या मतं मिळाली आता 'लाडकी बहीण' निकषांच्या कात्रीत सापडणार.
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?
लपण्यासाठी आरोपींचं 'पुणे'च फेव्हरेट डेस्टिनेशन का?.