संदीप क्षीरसागर यांचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!, घरातील सीसीटीव्हीत कैद झाला हा प्रकार

| Updated on: Apr 21, 2023 | 9:27 PM

संदीप आणि अर्जुन यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी केली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संदीप क्षीरसागर यांचा तो व्हिडीओ व्हायरल!, घरातील सीसीटीव्हीत कैद झाला हा प्रकार
Follow us on

बीड : बीडच्या क्षीरसागर कुटुंबात पुन्हा एकदा बापलेकाचा वाद चव्हाट्यावर आलाय. आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडील रवींद्र क्षीरसागर यांना धक्काबुक्की केली अशी घटना समोर आली. याबाबतची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. संदीप आणि अर्जुन यांनी धक्काबुक्की केल्याची तक्रार त्यांच्या वडिलांनी केली. त्यानंतर आमदार संदीप क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बीडचा आमदार असलेल्या माझ्या मुलाने मला धक्काबुक्की करून घराबाहेर हाकलून दिले. अशी तक्रार आमदार संदीप क्षीरसागर यांचे वडील रवींद्र क्षीरसागर यांनी बीड पोलिसात दिली होती. त्यानुसार आमदार संदीप क्षीरसागर यांच्यावर शिवाजीनगर पोलिसात जामीनपात्र गुन्हा दाखल झाला होता. त्यांनतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.


संदीप क्षीरसागर रागत दिसतात

आता शिवीगाळ करून वडिलांच्या अंगावर धावून जातानाचा तो व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत संदीप क्षीरसागर हे प्रचंड रागात दिसतायेत. ते सतत वडिलांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

सीसीटीव्हीत घटना कैद

तसेच दुसरा मुलगा अर्जुन क्षीरसागर हेदेखील वडिलांच्या अंगावर धावून जाताना दिसत आहेत. घरातील सीसीटीव्हीत हा सर्व प्रकार कैद झाला. घरातीलच सीसीटीव्ही व्हायरल झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

वडिलांची मुलाच्या विरोधात तक्रार

संदीप रवींद्र क्षीरसागर हे बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. ते बीड विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. एका आमदाराच्या घरातील वाद चव्हाट्यावर आल्याने चर्चा सुरू झाल्या. विशेष म्हणजे वडिलांनीच मुलाच्या विरोधात तक्रार केली. आता तो व्हिडीओसुद्धा व्हायरल झालाय.

आमदार संदीप क्षीरसागर यांनी वडिलांना धक्काबुक्की केली आहे. वडिलांच्या अंगावर धावून जातानाचा व्हिडीओ समोर आलाय. या व्हिडीओमुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली. संदीप क्षीरसागर यांच्या वडिलांची आधी तक्रार होती.

आता व्हिडीओ समोर आला आहे. यात संदीप हे संतापलेले दिसतात. कुटुंबीय त्यांना समजावण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, ते काही कुणाचं ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं दिसतय.