घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral
बीड (Beed) जिल्ह्यातल्या एका ट्रॅक्टर चालकाचा एक व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल (Viral) होतोय. हा व्हिडिओ शिरूर तालुक्यातला असून चिंचपूर घाटात ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा आहे.
बीड : बीड (Beed) जिल्ह्यातल्या एका ट्रॅक्टर चालकाचा एक व्हिडिओ (Video) सध्या चांगलाच व्हायरल (Viral) होतोय. या व्हिडिओत आपण पाहू शकता, की ट्रॅक्टर चालकाचं अनाठायी धाडस त्याच्या जीवावर बेतू शकलं असतं. हा व्हिडिओ शिरूर तालुक्यातला असून चिंचपूर घाटात ऊस वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा आहे. हा घाट पार करण्यासाठी जीवघेणा प्रवास करत असल्याचं यात दिसून येतंय. ट्रॅक्टरच्या ट्रॉलीस ब्रेक नसतो, त्यामुळे जर या ट्रॅक्टरचा ब्रेक फेल झाला असता तर मात्र मोठी दुर्घटना घडली असती.
घाट पार करण्यासाठी ट्रॅक्टरचालकाचा जीवघेणा प्रवास, बीड जिल्ह्यातला Video होतोय Viral #beed #Transport #stunts #ViralVideo #Viral #Trending #SocialMedia pic.twitter.com/luTVr8gBnb
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 21, 2022
मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक
बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर ऊसाची वाहतूक होत असते. ट्रॅक्टर्सना ट्रॉली जोडली जाते. कधी एक तर कधी एकापेक्षा अधिक ट्रॉली जोडल्या जातात. आधीच वजनदार असल्यामुळे मोठ्या प्रमाणावर धोका निर्माण होतो. जड वाहनांच्या वाहतुकीमुळे रस्त्यांची अवस्थाही अत्यंत खराब आहे.
ट्रॅक्टरला जोडल्या दोन ट्रॉली
या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, की कशाप्रकारे ट्रॅक्टरचा चालक अत्यंत धोकादायक पद्धतीनं ट्रॅक्टर चालवत आहे. या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या आहेत. दोन्हीही ट्रॉली अत्यंत वजनदार आहेत, कारण त्यात शेतमाल खच्चून भरला आहे. अशावेळी घाट पार करण्याच्या नादात ट्रॅक्टरचा चालक जीवावर बेतेल, अशापद्धतीनं ट्रॅक्टर चालवताना स्पष्ट दिसतंय.
‘धोकादायक वाहतुकीला लगाम घातला जावा’
ट्रॅक्टरच्या समोरची दोन्ही चाकं कशापद्धतीनं वर आलीत, आपल्याला व्हिडिओतून दिसून येईल. अशावेळी कोणती दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात रस्त्यांची अवस्था वाईट आहे. त्यामुळे अशाप्रकारे धोकादायक वाहतुकीला लगाम घातला जावा, अशी मागणी जिल्ह्यातल्या ग्रामस्थांनी प्रशासनाकडे केली आहे.