कोण आहेत वैजनाथ वाघमारे जे सुषमा अंधारे यांच्यापासून विभक्त राहतात?
2007 साली वैजनाथ वाघमारे व सुषमा अंधारे या दोघांची ओळख झाली आणि प्रेम झाले.
बीड : ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांचे विभक्त पती वैजनाथ वाघमारे यांनी शिंदे गटात प्रवेश केला. मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यामुळं वैजनाथ वाघमारे कोण आहेत, अशी चर्चा सुरू झाली. जाणून घेऊया वैजनाथ वाघमारे यांचा प्रवास. विभक्त पती वैजनाथ वाघमारे हे शिंदे गटात, तर पाच वर्षांपूर्वी विभक्त झालेली त्यांची पत्नी सुषमा अंधारे या ठाकरे गटात आहेत. त्यामुळं संघर्ष तर होणारचं ना, असं वैजनाथ वाघमारे म्हणतात.
वैजनाथ वाघमारे यांचं 22 वर्षांपूर्वी लग्न झाले आहे. त्यांची पत्नी मातंग समाजातील आहे. त्यांना चार मुले आहेत. ते सुरुवातीला बँड कला पथकात वाजंत्री होते. त्यानंतर त्यांनी वकिली पदवी घेतली. त्यावेळी त्यांचा संबंध दलित चळवळीशी आला. सुषमा अंधारे देखील चळवळीत होत्या.
2007 साली वैजनाथ वाघमारे व सुषमा अंधारे या दोघांची ओळख झाली आणि प्रेम झाले. त्यांच्या प्रेमाची चर्चा संपूर्ण गावात पसरली. तेव्हा वैजनाथ यांची पत्नी आणि सुषमा यात भांडणे होऊ लागली. सुषमा त्यावेळी अंबाजोगाईत भाड्याच्या खोलीत राहत होत्या. या दोघांना एक मुलगी असल्याचे समजते.
वैजनाथ यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यांना सावरण्यासाठी सुषमा यांनी आडस या गावात ब्लास्टिंग माईनचा कारखाना थाटून दिला. त्यानंतर वैजनाथ यांची परिस्थिती सुधारली, असं सांगितलं जातं. मात्र आर्थिक देवाणघेवाणीत यांचे सतत खटके उडत होते.
पाच वर्षांपासून सुषमा आणि वैजनाथ यांच्यात दुरावा आहे. सुषमा आणि वैजनाथ यांचा विवाह झाल्याची गावात कुठेही आणि नातेवाईकांना माहीत नाही. पाच वर्षांपूर्वी उमराई इथं सुषमा आणि वैजनाथ यांचं कडाक्याचं भांडण झालं, नातेवाईकांनी सोडवणूक केली. त्यानंतर यांचे संबंध बिनसले. जे आजतागायत आहे. दोघांनाही एकमेकांबद्दल फारसे काही माहिती नाही. त्यांचे संबंध नाहीत. पण, सुषमा अंधारे या ठाकरे गटात उपनेत्या आहेत. वैजनाथ हेही शिंदे गटात गेलेत. त्यामुळं वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे.