सरणावरती पती, घरात दु:खाचा आराडा, महिलेने जे केलं त्याने बीड हादरलं

बीड जिल्ह्यातील शिरूर कासार तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. एका शिक्षकाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यानंतर त्याच्या पत्नीने विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना खामकरवाडी गावात घडली. पतीच्या अकाली निधनानंतर पत्नीने हा टोकाचा निर्णय घेतला. या घटनेने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

सरणावरती पती, घरात दु:खाचा आराडा, महिलेने जे केलं त्याने बीड हादरलं
सरणावरती पती, घरात दु:खाचा आराडा, महिलेने जे केलं त्याने बीड हादरलं
Follow us
| Updated on: Nov 21, 2024 | 7:53 PM

कोणतंही कारण असो, आत्महत्या हा त्यावर पर्याय असूच शकत नाही. खरंतर मृत्यू हे अंतिम सत्य आहे. पण आत्महत्या करणं अतिशय चूक आहे. आपल्या जवळच्या व्यक्तीचं अकाली निधन झालं म्हणून आपणदेखील तसा टोकाचा निर्णय घेणं असा विचार करणं अतिशय चूक आहे. संकट हे सांगून येत नाही. ते येतं. नियतीचा भोग म्हणून अशा संकटाला सामोरं जाण्याशिवाय आपल्याकडे दुसरा पर्याय नसतो. त्यामुळे अशा संकट काळात संयमाने परिस्थिताला सामोरं जाणं अपेक्षित आहे. पण काही जण संयम सोडून आत्महत्या सारखा टोकाचा निर्णय घेतात. बीड जिल्ह्यातदेखील अशीच एक धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे.

बीड जिल्हा एका धक्कादायक घटनेने हादरलं आहे. शिक्षक पतीच्या निधनानंतर पत्नीने विषारी औषध पिवून स्वत:ची जीवनयात्रा संपवली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खामकरवाडी येथे ही घटना आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे. शिरूर कासार तालुक्यातील खामकर वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर कार्यरत असलेल्या शिक्षकाचा पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली होती. घटनेच्या काही तासातच त्यांच्या पत्नीने विषारी औषध प्राशन करून पती पाठोपाठ आपला जीवन प्रवास थांबवला या घटनेनंतर तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

हे सुद्धा वाचा

खामकरवाडी येथील शिक्षक कन्हैया लाल खामकर (वय 52 वर्ष) हे तालुक्यातील आर्वी केंद्रांतर्गत असलेल्या शिंदे वस्ती शाळेवर शिक्षक म्हणून कार्य करीत होते. त्यांना आज (21 नोव्हेंबर, वार-गुरुवार) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास ह्रदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूचा शोक कुटुंब व्यक्त करीत असतानाच त्यांच्या पत्नी राहीबाई कन्हैयालाल खामकर (वय 45 वर्ष) यांनी पुढील काही वेळातच विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. त्यांचा मृतदेह शिरूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.