Bhandara Accident : भंडाऱ्यात बसच्या धडकेत पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू

पोलीस हवालदार धूलिनचंद बरवैय्या हे मूळ गावी आले होते. घरचे काही सामान घेण्यासाठी धूलिनचंद आपल्या अॅक्टिव्हावरुन बाजारात गेले होते. यावेळी राजीव गांधी चौकात येताच भंडारा आगरातून रामटेकसाठी सुटलेल्या बसने धूलिनचंद यांना समोरासमोर धडक दिली.

Bhandara Accident : भंडाऱ्यात बसच्या धडकेत पोलीस हवालदाराचा जागीच मृत्यू
अंबरनाथमध्ये ट्रकची कार आणि रिक्षाला धडकImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Jun 13, 2022 | 5:54 PM

भंडारा : बसच्या धडकेत एका पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू (Death) झाल्याची घटना भंडारा शहरात आज दुपारी घडली आहे. धूलिनचंद बरवैय्या (47) असे मयत पोलिसाचे नाव आहे. धूलिनचंद हे गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पोलिसात हवालदार (Police Constable) पदावर कार्यरत होते. ते मूळचे भंडारा शहरातील समता नगर येथील रहिवासी आहेत. धूलिनचंद सध्या सुट्टी घेऊन आपल्या मूळगावी आले होते. घरुन सामान घेण्यासाठी जात असतानाच गांधी चौकात त्यांचा अपघात (Accident) झाला. अपघाताची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत बस चालकाला ताब्यात घेतले. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

सामान घेण्यासाठी जात असताना अपघात

पोलीस हवालदार धूलिनचंद बरवैय्या हे मूळ गावी आले होते. घरचे काही सामान घेण्यासाठी धूलिनचंद आपल्या अॅक्टिव्हावरुन बाजारात गेले होते. यावेळी राजीव गांधी चौकात येताच भंडारा आगरातून रामटेकसाठी सुटलेल्या बसने धूलिनचंद यांना समोरासमोर धडक दिली. धडक इतकी जबर होती की ते चक्क बसच्या रेडिएटरला आदळले. यात ते गंभीर जखमी होत त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती शहर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला. तसेच पोलिसांनी बस चालकाला ताब्यात घेत पुढील कारवाई करत आहेत.

लाखनीत वीज पडून गुराख्याचा मृत्यू

गुरे चरायला घेऊन गेलेल्या गुराख्याचा वीज पडून दुर्देवी मृत्यू तर दोन बालके गंभीर जखमी झाल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील शिवनी मोगरा येथे घडली आहे. पिसाराम चचाने (60) असे मयत गुराख्याचे नाव आहे. पिसाराम गायी चारण्यासाठी तर दोन्ही बालके शेळ्या चारण्यासाठी शेतात गेले होते. दरम्यान पावसाला सुरुवात झाली असता पिसाराम व दोन बालकांनी एका झाडाखाली आश्रय घेतला. दरम्यान अचानक वीज कोसळल्याने पिसाराम चचाने व दोन्ही बालके गंभीररीत्या भाजली. तिघांनाही गावकऱ्यांनी लाखनी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी पिसाराम यांना मृत घोषित केले. (A police constable was killed on the spot in a bus collision in Bhandara)

हे सुद्धा वाचा

मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.