Bhandara Accident : भीषण अपघातानंतर ट्रकला आग, आगीत ट्रक चालक जिवंत जळाला! ट्रक-टिप्परची समोरासमोरच जोरदार धडक

Bhandara Accident News : या अपघातातील धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर स्पार्क होऊन कोळसा भरलेला ट्रकला आग लागली.

Bhandara Accident : भीषण अपघातानंतर ट्रकला आग, आगीत ट्रक चालक जिवंत जळाला! ट्रक-टिप्परची समोरासमोरच जोरदार धडक
भीषण अपघात..Image Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 06, 2022 | 9:38 AM

भंडार : भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दोन ट्रक मध्ये भीषण अपघात (Road Accident News) घडला. या पघातानंतर ट्रकला आग लागली. या आगीमध्ये ट्रकचा चालक जिवंत जळाल्याची (Burn Alive) दुर्दैवी घटना घडली. भंडारा-तुमसर राज्य मार्गावर दाबा गावात दोन ट्रकमध्ये हा भीषण अपघात (Bhandara Accident Video) झाला. दुसऱ्या ट्रकच्या ड्राइवर वेळीच बाहेर निघाल्याने त्याचे प्राण वाचले. दाबा गावाजवळ कोळसा भरून जात असलेला ट्रकला भरधाव येणाऱ्या टिप्पर ट्रकने आमरासमोर जबर धडक दिली. या अपघातातील धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर स्पार्क होऊन कोळसा भरलेला ट्रकला आग लागली. वेळीच कोळसा भरलेला ट्रकचा ड्राइवर बाहेर निघाला. मात्र टिप्पर ट्रक चे कॅबिन चेपल्याने ड्राइवर अडकून पडला. त्याला बाहेर निघण्याचा कोणताच मार्ग नव्हता.

पाहा व्हिडीओ :

कोळसा भरलेल्या ट्रकला लागलेली आग टिप्पर ट्रकलाही लागली. बघता बघता आग प्रचंड भडकली. या आगीत टिप्परमध्ये अडकलेला ड्रायवर जळून खाक झाला. याची माहिती वरठी पोलिसांना आणि अग्निशमन दलाला देण्यात आली असून घटनास्थळ गाठत अग्निशमन दलाला आग विझवण्यात यश आलंय. वरठी पोलिसांकडून या अपघातप्रकरणी अधिक तपास केला जातोय.

कसा झाला अपघात?

ओव्हर टेक करण्याच्या नादात हा अपघात झाला असावा असा संशय व्यक्त केला जातोय. कोळशाने भरलेला ट्रक विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये घुसला होता. तर समोरुन येणाऱ्या टिप्परलाही वळणावर अचानक ट्रक आल्यानं गाडी बाजूला घेण्यासाठी मार्ग उरला नव्हता. यामुळे एकाच लेनमध्ये समोरासमोर आल्यामुळे हा भीषण अपघात घडला.

ट्रकच्या चालकानं प्रसंगावनधान राखल्यानं त्याला लगेचच गाडीतून उडी मारुन स्वतःचा जीव वाचवता आला होता. मात्र टिप्परचा चालक या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत होरपळला आणि त्यातच त्याचा जीव गेला.

प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.