Video – भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे बनले कातकर! पिंपळगावच्या शंकरपटात हाकलला शेकडा
भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे त्यांनी बैलांचा शेकडा हाकलून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. शंकरपटाच्या उद्घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलण्याचा मनसोक्त आनंद लुटला.
तेजस मोहतुरे
भंडारा : नागपूरचा खासदार महोत्सव सर्वत्र प्रसिद्ध झाला. क्रीडा, सांस्कृतिक महोत्सवांचं आयोजन केलं जातं. याच धर्तीवर भंडाऱ्यात खासदार सुनील मेंढे (MP Sunil Mendhe) यांनी यंदा क्रीडा महोत्सवाचं (Sports Festival in Bhandara) आयोजन केलंय. यानिमित्त त्यांनी लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे शंकरपटाचं आयोजन केलंय. यापूर्वी पिंपळगावात शंकरपट (Shankarpat in Pimpalgaon) भरविण्यात आला होता. पण, पोलिसांनी परवानगी नाकारल्यानं हा शंकरपट रद्द करण्यात आला होता. आता खासदार मेंढे यांनीचं शंकरपटाचं आयोजनात पुढाकार घेतल्यानं हा शंकरपट होत आहे. काल या शंकरपटाचे उद्घाटन करण्यात आले.
पिंपळगावच्या पटाचे 97 वे वर्ष
भंडारा जिल्ह्यात पिंपळगावच्या पटाला मोठी परंपरा आहे. यंदाचे 97 वा वे वर्ष आहे. खर म्हणजे कोर्टानं बैलगाड्या शर्यतींवर बंदी आणल्यामुळं गेल्या सहावर्षांपासून शंकरपट बंद होते. परंतु, यंदा सर्वोच्च न्यायालयानं यावरील बंदी हटवली. कोरोनाचे संकट असल्यानं गर्दी टाळण्यासाठी पटावर पुन्हा निर्बंध लावण्यात आले. पण, आता कोरोनाचे नियमही शिथिल होत आहेत. त्यामुळं या शंकरपटाचं आयोजन करण्यात आलंय.
पाहा व्हिडीओ
खासदारांचं रांगडं रुप… pic.twitter.com/2IttneUh6Q
— Siddhesh Sawant (@ssidsawant) February 27, 2022
खासदार मेंढे बसले शेकड्यावर
भंडाऱ्याचे खासदार सुनील मेंढे यांनी क्रीडा महोत्सवाचे आयोजन केले. लाखनी तालुक्यातील पिंपळगाव सडक येथे त्यांनी बैलांचा शेकडा हाकलून शेतकऱ्यांचा उत्साह वाढविण्याचा प्रयत्न केला. शंकरपटाच्या उद्घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बैलगाडी हाकणे आणि शेकडा हाकलणं यात फरक असतो. शेकड्याला जुंपलेले बैल तुफान असतात. पटाचे बैल असल्यानं ते सैराट सुटतात. शेकडा हाकलण्यासाठी मजबूत बांध्याचे कातकर हवेत. कातकर होण्यासाठी हिंमत लागते. ही हिंमत खासदार मेंढे यांनी दाखविली. उद् घाटनावेळी त्यांनी शेकडा हाकलला. शेकडो लोकं हे सारं पाहत होते. खासदार मेंढे हे शेकडा सावधतेने हाकलतं होते. शेवटी पटाच्या बैलांना थांबवून खासदार साहेब उतरले. त्यानंतर खरे कातकर बसले नि शंकरपट सुरू झाला. आज जिंकणाऱ्या जोड्यांना बक्षीस दिली जातील.