मुलीच्या घरी मुक्कामाला गेले, पण काळाचा घाला, माजी आमदार हरपले, महाराष्ट्र भाजपवर शोककळा

भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भंडाऱ्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे.

मुलीच्या घरी मुक्कामाला गेले, पण काळाचा घाला, माजी आमदार हरपले, महाराष्ट्र भाजपवर शोककळा
Follow us
| Updated on: Jun 03, 2023 | 9:45 PM

भंडारा : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक वाईट बातमी समोर येत आहे. भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे माजी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झालं आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने भंडाऱ्यातील भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. रामचंद्र अवसरे हे भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीत निमंत्रित सदस्य होते. 2014 ते 2019 या कालावधीत ते भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार राहिले आहेत. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण भंडारा जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.

रामचंद्र अवसरे 65 वर्षांचे होते. ते शुक्रवारी (2 जून) भाजपची भंडारा येथील बैठक आटोपून मुलीच्या घरी मुक्कामासाठी गेले होते. पण तिथे त्यांची अचानक प्रकृती बिघडली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबात मोठी खळबळ उडाली. कुटुंबियांची प्रचंड धावपळ झाली. त्यांना तातडीने भंडारा शहरातील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण उपचारा दरम्यान त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचं निधन झालं.

खरंतर रामचंद्र अवसरे यांना भाजपच्या बैठकीतच अस्वस्थ वाटत होतं. ते कसंतरी बैठक आटोपून आपल्या मुलीच्या घरी आले होते. मुलीच्या घरी आल्यानंतर त्यांची प्रकृती जास्त बिघडली. त्यामुळे त्यांना तातडीने भंडाऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण रामचंद्र अवसरे यांनी सायंकाळच्या सुमारास उपचारांना प्रतिसाद देणं बंद केलं. डॉक्टरांनी शुक्रवारी (2 जून) संध्याकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास रामचंद्र अवसरे यांचं निधन झाल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णालयाबाहेर भाजप कार्यकर्त्यांची गर्दी जमली.

रामचंद्र अवसरे यांच्या निधनामुळे भंडारा जिल्ह्यात भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाल्याची प्रतिक्रिया येथील स्थानिक कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहेत. रामचंद्र यांच्या पार्थिवावर उद्या त्यांच्या मूळ गावी पवनी येथे वैजेश्वर मोक्षधाम पवनी येथे दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आमदार रामचंद्र अवसरे हे आधी शिवसेनेचे कार्यकर्ते होते. ते 2009 पर्यंत शिवसेनेत होते. पण 2009 ला त्यांनी शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली नव्हती. त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी लढवली होती. पण त्यावेळी त्यांना पराभवाला मुकावं लागलं होतं. या दरम्यान 2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी त्यांनी भाजपात प्रवेश केला. भाजपने त्यांना निवडणुकीचं तिकीट दिलं होतं. या निवडणुकीत ते जिंकून आले होते. ते 2014 ते 2019 या काळात आमदार होते.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.