“नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं”; पटोलेंच्या आरोपानंतर भाजपनं त्यांना उडवून लावलं

भाजपविरोधात तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्यायचं हे काम तुमचं नाही काय असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही नागरिकशास्त्र शिकला आहात की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं; पटोलेंच्या आरोपानंतर भाजपनं त्यांना उडवून लावलं
Follow us
| Updated on: May 20, 2023 | 5:08 PM

भंडारा : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ढवळून निघाले आहे. त्यातच दंगलीवरूनही आरोप प्रत्यारोप केले जात आहेत. दंगलीवरून केल्या गेलेल्या आरोपामुळे आता भाजपकडूनही विरोधकांवरही जोरदार हल्लाबोल केला जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना भाजपकडून जातीय तेढ निर्माण केले जात असून त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत असल्याचा आरोपा त्यांनी भाजपवर केला होता. त्यावर आता मंत्री सुधीर मुनगंटीवार जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीका करताना जातीय आणि धार्मिकतेच्या मुद्यावरून त्यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली होती.

त्यावर सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे. नाना पटोले यांनी आधी आदर्श नागरिक बनावं, त्यानंतर दुसऱ्यावर आरोप करावा असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यावर टीका करताना म्हणाले की, भाजपाचे चांगले काम आहे असे नाना पटोले का म्हणतील? असा टोला त्यांनी त्यांना लगावला आहे.

भाजपवर टीका करणे, धार्मिक आणि जातीयतेचे आरोप करणे हे काँग्रेसचे कामच आहे अशी टीकाही त्यांनी त्यांच्यावर केली आहे.

काँग्रेसचेन नेते कधी म्हणतात आरडीएक्स घेऊन गेले असा त्यांनी आरोप केला असला तरी ते कधी आदर्श नागरिक बनण्याचा प्रयत्न करीत नाही असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले आहे.

भाजपविरोधात तुमच्याकडे जर पुरावे आहेत तर पोलिसांना द्यायचं हे काम तुमचं नाही काय असा प्रतिसवालही त्यांनी यावेळी केला आहे. तुम्ही नागरिकशास्त्र शिकला आहात की नाही? असा सवालही त्यांनी यावेळी केला आहे.

सातशे गुणांपैकी 25 गुणही शिकले नाही? तुम्ही जर भारतीय आहात तर पोलीसांना माहिती का दिली नाही? असा खडा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी नाना पटोले यांना केला आहे. तर भाजपा जातीय तेढ निर्माण करते या त्यांच्या आरोपांवर त्यांनी काँग्रेस आणि पटोले यांचा समाचार घेतला आहे.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.