गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आजपासून सुरू, श्रेय कुणाचे प्रफुल्ल पटेल की सुनील मेंढे यांचे?

गोंदियातील बिरसी विमानतळावरून इंदोर-गोंदिया-हैदराबाद अशी विमान वाहतूक सेवा रविवार, 13 मार्चपासून सुरू होत आहे. परंतु, ही विमान वाहतूक सेवा कुणामुळं सुरू झाली, यावरून दोन्ही खासदारांमध्ये शितयुद्ध सुरू आहे. माझ्याच प्रयत्नामुळं ही सेवा सुरू झाल्याचं भाजपाचे खासदार सुनील मेंढे म्हणतात, तर व्यवस्था आम्हीच केल्याचं राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल पटेल यांचं म्हणणंय.

गोंदिया ते हैदराबाद विमानसेवा आजपासून सुरू, श्रेय कुणाचे प्रफुल्ल पटेल की सुनील मेंढे यांचे?
खासदार प्रफुल्ल पटेल आणि खासदार सुनील मेंढेImage Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Mar 13, 2022 | 8:17 AM

गोंदिया : गोंदिया येथील बिरसी विमानतळावरून (Birsi Airport) प्रवासी वाहतुकीचा प्रश्न अखेर सुटला. 13 मार्चपासून प्रत्यक्ष प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार आहे. बिरसी विमानतळावरून इंदोर ते गोंदिया ते हैदराबाद असे पहिले उड्डाण उडेल. या सेवेविषयी भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याच्या नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. व्यापार आणि अन्य दृष्टिकोनातून विमान सेवा महत्त्वाची आहे. केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया (Jyotiraditya Scindia) यांच्या हस्ते या सेवेचा शुभारंभ होणार आहे. विशेष म्हणजे रविवारपासून सुरू होणाऱ्या सेवेच्या पार्श्वभूमीवर पहिल्या विमानाचे बुकिंग पूर्ण झाले असल्याची माहिती आहे.

खासदार सुनील मेंढे म्हणतात…

सर्व शहरांना देशाशी जोडण्याच्या विचार देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आहे. कमी दरात हवाई प्रवास करण्याची संधी या योजनेअंतर्गत उपलब्ध झाली आहे. बिरसी विमानतळावरून सुरू होत असलेली विमान सेवा त्याचाच एक भाग आहे. खासदार झाल्यानंतर सुनील मेंढे यांनी सातत्याने या गोष्टीचा पाठपुरावा केला. विमानतळ प्राधिकरण, नागरी उड्डाण मंत्रालयातील सर्व प्रमुख अधिकारी आणि मंत्र्यांना भेटले. खासदारांनी प्रवासी वाहतूक सुरू होणे किती गरजेचे आहे हे पटवून दिले. वाहतूक सुरू करण्याच्या दृष्टीने येणाऱ्या अडचणी दूर केल्या. त्यासाठी अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या गेल्या, असं भाजपाचे खासदार सुनील मेंढे यांचे म्हणणे आहे.

खासदार प्रफुल्ल पटेल म्हणतात…

केंद्र सरकारमध्ये नागरी विमान मंत्री असताना गोंदियाच्या भविष्याचा विचार केला. बिरसी येथे असलेल्या इंग्रज काळातील विमानतळाला नवीन स्वरूप दिले. दिवसा तसेच रात्री विमाने उतरतील, अशी व्यवस्था केली. त्याच धावपट्टीवरून 13 मार्च रोजी विमान वाहतूक सेवा सुरू होत आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग व माजी कृषी मंत्री शरद पवार यांचे सरकार असताना या सेवेचे प्लानिंग केले होते. बिरसी येथील विमानतळाला अत्याधुनिक विमानतळाच्या दर्जा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी विमानतळाची व्यवस्था केली. त्यामुळं ही विमानसेवा सुरू होत असल्याचं प्रफुल्ल पटेल यांच्या कार्यालयातून जारी झालेल्या पत्रकात म्हटलं आहे.

Video – Nagpur | प्रभाग रचनेची काम पुन्हा राज्याकडे येणार? विजय वडेट्टीवार यांनी नेमकं काय सांगितलं

वर्ध्यातील शेतकरी महिला जिल्हाधिकारी कार्यालयात जप्तीसाठी येते तेव्हा… कशी उडते कार्यालयात धांदल?

भंडाऱ्यात काम न करताच पैशांची उचल, पांदण रस्ते गायब! महालगाव ग्रामपंचायतीचा गैरकारभार?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.