AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video Raju Karemore | भंडाऱ्यात जय भीमच्या तालावर थिरकले आमदार, राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरेंचा डान्स एकदा बघाच…

मिरवणुकीतील दृश्य. ढोल ताशा पथकाचा आवाज. त्यात निळा फेटा परिधान करून आमदार राजू कारेमोरे नाचताना दिसत आहेत. हात वर करून नृत्य करत आहेत. भीम जयंतीच्या कार्यक्रमात नाचण्याचा मोह आमदार साहेबांना आवरता आला नाही.

Video Raju Karemore | भंडाऱ्यात जय भीमच्या तालावर थिरकले आमदार, राष्ट्रवादीच्या राजू कारेमोरेंचा डान्स एकदा बघाच...
भंडाऱ्यात नृत्य करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार राजू कारेमोरे Image Credit source: tv 9
Follow us
| Updated on: Apr 15, 2022 | 9:40 AM

भंडारा : अमरावतीच्या खासदार नवनित राणा या अभिनयाकडून राजकारणाकडं वळल्या. त्यामुळं नृत्य करणं त्यांच्यासाठी सोप्प आहे. इतर राजकारणीही आता नृत्याकडं वळू लागले आहे. विजय वडेट्टीवार हे बंजारा समाजाच्या कार्यक्रमात नृत्य करताना दिसले. त्यात राष्ट्रवादीचे नेते कसे मागे राहणार. मोहाडी-तुमसर (Mohadi-Tumsar) विधानसभा क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे हेही आता नृत्य सादर करतात. पण, कधी-कधी म्हणजे विशेष कार्यक्रमात कुणी आग्रह केला तर दोन ठुमके मारायला काय जाते. काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Babasaheb Ambedkar) यांची जयंती होती. या निमित्त ठिकठिकाणी कार्यक्रम झाले. ढोल-ताशा वाजले. मिरवणुका निघाल्या. अशा कार्यक्रमांमध्ये लोक एकत्र येतात. त्यामुळं राजकारण्यांना तिथं लोकांना भेटायला जावचं लागतं. राजू कारेमोरे (Raju Karemore) हेही भीम जयंतीच्या कार्यक्रमात गेले.

कार्यक्रम भीम जयंतीचा

राजू कारेमोरेचे यांचे व्हिडीओ सध्या चर्चेचा विषय बनत आहेत. तीन-चार महिन्यांपूर्वी राजू कारेमोरे यांचा वादग्रस्त व्हिडीओ चर्चेत आला. तो म्हणजे दोन नंबरचे पैसे मागणाऱ्या मोहाडी पोलिसांच्या विरोधात. पण, आमदार साहेबांची जिभ जरा जास्तच घसरली. त्यामुळं अपशब्द बाहेर पडले. पोलिसांनी त्यांच्याविरोधातच गुन्हे नोंदविले. कैदेतही टाकले. पण, त्यातून ते जामिनावर सुटले. त्यानंतर एक दुसरा व्हिडीओ बाहेर आला. तो म्हणजे व्यायाम करतानाचा. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची बाजू मजबूत करत आहोत की, काय असा संदेशच त्यांनी यानिमित्तानं दिला. आणि आता तिसरा महत्त्वाचा व्हिडीओ. हा म्हणजे भीम जयंतीच्या कार्यक्रमाचा. त्यामुळं निळा फेटा त्यांनी बांधला आहे. निळ्या रंगाच्या फेटात राजू कारेमोरे नाचताना दिसत आहेत.

पाहा व्हिडीओ

ढोल पथकाच्या तालावर धरला ठेका

आता ढोल पथकाच्या तालावर नाचतांना राजू कारेमोरे दिसत आहेत. ढोल पथक वाजले की भल्या भल्याना नाचल्याविना राहू शकत नाही. तिथं तुमसर मोहाडीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार कसे सुटणार. काल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त निघालेल्या भीम सैनिकांच्या रॅलीत ढोल पथक होते. ढोल पथकाचा तालावर युवकांचा घोळका नाचत होता. त्यांना बघून मोह न आवराल्याने तिथं उपस्थित असलेले आमदार त्या घोळक्यात सामील झाले. ढोल पथकाच्या तालावर ठेका धरला. या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. नेटकरांनी त्यांना चांगल्या कमेंट्स दिल्या आहेत. त्यामुळं राजू कारेमोरे पुन्हा एकदा चर्चेत आले.

Video Chandrasekhar Bavankule | महाराष्ट्र होरपळतोय ऊर्जा व महसूल मंत्रालयाच्या वादात; नागपुरात चंद्रशेखर बावनकुळे यांचा घणाघात, त्वरित 20 हजार कोटी देण्याची मागणी 

NMC | अग्निशमन विभागात मोठी पदभरती, 100 पदे भरण्याचा निर्णय, नागपूर मनपा आयुक्तांची माहिती

Nagpur Police | नागपूर पोलिसांची धडक कारवाई, दोन दिवसांत 17 गुंड तडीपार! गुन्हेगारांचे धाबे दणाणले

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?
पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?.
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन.
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद
भारताकडून डिजिटल स्ट्राईक; थेट पंतप्रधानांचं यूट्यूब चॅनेलच केलं बंद.
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना
अटारी बॉर्डरवर तोबा गर्दी, स्वतःच्या नागरिकांसाठी पाकिस्तान गेट उघडेना.
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत...
बिलावल भुट्टोची मोठी कबुली, पाकिस्तानला एक भूतकाळ अन् त्याची किंमत....
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?
कुठं तापमानात वाढ तर कुठं पाऊस पुढील काही दिवस राज्यात कसं वातावरण?.
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी
भारताकडून हल्ल्याच्या भीतीने धूम ठोकलेल्या असीम मुनीरची पोकळ धमकी.
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर
...तर 15 एप्रिललाच पहलगामवर झाला असता हल्ला पण... खळबळजनक माहिती समोर.
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरमध्ये हाय अलर्ट जारी.
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार
मी शेतकरी कर्ज माफीचं आश्वासन मी दिलं नाही - उपमुख्यमंत्री अजित पवार.